सप्टेंबर 2022 हा महिना दिग्गज क्रिकेटपटू आणि महान कर्णधार एमएस धोनी याच्या साथी खेळाडूंसाठी चांगला राहिलेला नाही. या महिन्यात, त्यातही गेल्या 9 दिवसांत धोनीच्या 3 स्टार संघसहकाऱ्यांनी एका-पाठोपाठ-एक निवृत्ती घेतली आहे. यांपैकी एक धोनीचा जवळचा मित्रही आहे. सुरेश रैना, ईश्वर पांडे आणि रॉबिन उथप्पा हे ते तिघे क्रिकेटपटू आहेत.
चिन्नाथालापासून झाली सुरुवात
सर्वप्रथम सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. रैनाने धोनीमागोमाग 15 ऑगस्ट 2020 लाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र यंदा त्याने क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून आणि देशांतर्गत क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे. रैना 2 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेश संघाकडून खेळत होता. मात्र मागील आयपीएल 2022च्या हंगामात रैनाला कोणीही खरेदीदार मिळाला नव्हता.
ज्यानंतर 6 सप्टेंबर 2022 ला त्याने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. आता तो रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज खेळ आहेत. यानंतर दक्षिण आफ्रिकेतील एसएटी20 लीग खेळण्याचीही तयारी त्याने दाखवली आहे.
रैनानंतर पांडेचा नंबर
रैनानंतर मध्यप्रदेश संघाला पहिल्यांदा रणजी ट्रॉफी जिंकून देणारा स्टार वेगवान गोलंदाज ईश्वर पांडे याने 12 सप्टेंबर 2022 ला आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटला अलविदा केला. 33 वर्षीय पांडेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याच्या फार कमी संधी मिळाल्या होत्या. तो 2014 सालच्या भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघात निवडला गेला होता. मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवण्यात अपयशी ठरल्याने त्याचे भारताकडून क्रिकेट खेळण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले होते.
तो आयपीएलमध्ये एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाचा भाग राहिला आहे. आयपीएलमध्ये त्याने 25 सामने खेळले आहेत. या 25 सामन्यांमध्ये त्याने 18 विकेट्स घेतल्या आहेत. चेन्नईव्यतिरिक्त पुणे वॉरियर्स आणि रायझिंग सुपर जायंट्स संघाचा तो भाग राहिला आहे.
रॉबिन उथप्पाही निवृत्त
आता 14 सप्टेंबर 2022 रोजी चेन्नई सुपर किंग्जचा स्टार सलामीवीर रॉबिन उथप्पा याने क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्तीची घोषणा केली आहे. उथप्पा धोनीच्या नेतृत्त्वाखालील 2007 च्या टी20 विश्वचषक विजेत्या संघाचा प्रमुख सदस्य होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीचे भविष्य आहेत ही पंचरत्ने
पंधरा वर्षांचा दुष्काळ संपवत भारत उंचावेल का टी20 विश्वचषक? महान कर्णधाराने वर्तवले भाकित
राजस्थान रॉयल्सच्या फ्रॅंचायजीचा हेड कोच झाला जेपी डुमिनी, कोचिंग स्टाफची यादीही झाली जाहीर