इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगाम (IPL 2022) चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांसाठी निराशाजनक राहिला. दरम्यान हे दोन्ही संघ या हंगामातील ५९ व्या सामन्यात आमने-सामने आले होते. या सामन्यात मुंबईने ५ विकेट्सने बाजी मारली आणि चेन्नईचे प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठीचे आव्हान संपुष्टात आले. तसेच या सामन्यापूर्वीच मुंबईचेही आव्हान संपले होते. दरम्यान, या सामन्यात चेन्नईला पराभवाचा धक्का बसला असला, तरी कर्णधार एमएस धोनी याने मुंबई इंडियन्सच्या सदस्यांना एका गोष्टीमुळे खुश केले आहे.
धोनी हा केवळ चाहत्यांचाच नाही, जगभरातील अनेक खेळाडूंचाही प्रिय क्रिकेटपटू आहे. त्यामुळे तो जिथेही जातो, तिथे त्याला आदर मिळताना दिसतो. असेच दृश्य चेन्नई विरुद्ध मुंबई सामन्यानंतरही पाहायला मिळाले. आपल्या कारकिर्दीच्या शेवटाकडे झुकलेला धोनी मुंबईतील काही युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसला होता.
इतकेच नाही, तर धोनीने मुंबईच्या काही खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना त्याच्या जर्सीवर स्वाक्षरी करत ती भेट दिली. त्याच्या या कृतीचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे ही असे करण्याची धोनीची पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्याने अनेकदा दुसऱ्या संघातील खेळाडूंना जर्सीवर स्वाक्षरी करत ती भेट दिली आहे (Gift Jersey with Sign).
Unskippable classic chats post game! ????#WhistlePodu #Yellove ???????? pic.twitter.com/IVRgytntC1
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 13, 2022
MS Dhoni gifting his signed CSK jersey to few Mumbai Indians players/support staffs. Nice gesture from Mahi. pic.twitter.com/AB4oOZXgjC
— Johns. (@CricCrazyJohns) May 12, 2022
धोनीची यंदा चांगली कामगिरी
चेन्नई सुपर किंग्सची (CSK) आयपीएलच्या १५ व्या हंगामात खास कामगिरी झालेली नसली, तरी धोनीने वैयक्तिकरित्या चांगली कामगिरी केली आहे. त्याने १२ सामन्यांत ३८.८० च्या सरासरीने १९९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे.
मुंबईने केला चेन्नईचा पराभव
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई कडून केवळ एमएस धोनीने (MS Dhoni) ३० धावांचा टप्पा ओलांडला. त्याने नाबाद ३६ धावा करताना चेन्नईला ९७ धावापर्यंत पोहचवले. मुंबईकडून डॅनिएल सॅम्सने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्यानंतर ९८ धावांचे आव्हान मुंबई इंडियन्सने १४.५ षटकात पूर्ण केले. त्यामुळे चेन्नईचा पराभव झाला. मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक नाबाद ३४ धावांचे योगदान दिले. चेन्नईकडून मुकेश चौधरीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या (Chennai Super Kings vs Mumbai Indians).
मुंबई-चेन्नई बाहेर
मुंबईने आत्तापर्यंत आयपीएल २०२२ हंगामात १२ सामन्यांत ३ विजय मिळवले असून ९ पराभव स्विकारले आहेत. तसेच चेन्नईने आयपीएलच्या या १५ व्या हंगामात १२ सामन्यांत ४ विजय मिळवले असून ८ पराभव पत्करले आहेत. त्यामुळे या आयपीएलच्या गुणतालिकेत चेन्नई ९ व्या आणि मुंबई १० व्या क्रमांकावर आहेत. त्याचमुळे या दोन्ही संघांचे आव्हानही संपुष्टात आले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असून २०१७ पासून या दोन संघाव्यतिरिक्त अन्य कोणत्याच संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवता आलेले नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
रबाडा @200! बेंगलोरविरुद्धच्या ३ विकेट्ससह मलिंगा, गुलला पछाडत ‘या’ विक्रमात गाठले तिसरे स्थान
अरेरे! पंजाबविरुद्ध पराभव तर झालाच, पण आरसीबीने ‘या’ नकोशा यादीतही पटकावला अव्वल क्रमांक
एकदम जबराट! मॅक्सवेलचा स्विच हिट पाहून विराटही आला जोशमध्ये; चाहरला भिरकावला जबरदस्त षटकार






