आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यासाठी चेन्नई सुपर किंग्जचे अनेक खेळाडू यूएईला पोहोचले आहेत आणि पहिल्या सराव सत्रात भाग घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी, सुरेश रैना, दीपक चाहर, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा, युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि इतर काही खेळाडूंचा यात समावेश आहे.
एमएस धोनी तरुणांना अनेकदा मार्गदर्शन करताना दिसतो आणि अलीकडेच आयपीएल संघाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडला त्याच्या फलंदाजीशी संबंधित टिप्स देताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघ दुबईतील आयसीसी अकादमीमध्ये सराव करत आहे.
या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सर्व खेळाडू सराव करत आहेत आणि काही खेळाडू त्याच्यामध्ये विनोद करत आहेत. एमएस धोनी गायकवाडच्या शेजारी उभा आहे आणि त्याला फलंदाजीच्या महत्त्वाच्या गोष्टी शिकवत आहे. व्हिडिओ बारकाईने पाहिल्यानंतर, धोनी असे म्हणत आहे की, बचावात्मक फटके खेळण्याऐवजी चेंडू आपल्याकडे येऊ दे.
ऋतुराज गायकवाडला चेन्नई सुपर किंग्जच्या महत्त्वाच्या फलंदाजांपैकी एक मानले जाते. गायकवाडने आयपीएल २०२० मध्ये सलामीवीर म्हणून यशस्वी पदार्पण केले आहे. २०२१ हंगामाच्या सुरुवातीला गायकवाडची कामगिरी चांगली नव्हती. मात्र, त्याने वेळेत पुनरागमन केले आणि सात सामन्यांत १९६ धावा केल्या आहेत. फाफ डू प्लेसिससह त्याने सीएसकेला अनेक वेळा सुरक्षित सुरुवात करुन दिली आहे.
आयपीएल २०२१ मधील त्याच्या कामगिरीच्या बळावर गायकवाडने निवडकर्त्यांचे लक्ष वेधले. गायकवाडने अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या टी -२० मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. त्याने दोन डावांमध्ये ३५ धावा केल्या. त्याच्याकडून आता आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात चांगल्या कामगिरीची आशा चेन्नईला असेल. चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात १९ सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिला सामना खेळेल.
महत्त्वाच्या बातम्या –
गुडन्यूज आली रे! महिला क्रिकेटर मेगन शटच्या जोडीदार जेसने दिला चिमुकलीला जन्म; पाहा क्यूट फोटो
राहुल द्रविडच्या नकारानंतर भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी ‘हे’ नाव आहे आघाडीवर