चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर २० धावांनी विजय नोंदवताना उत्कृष्ट कामगिरी केली. सुरुवातीला चेन्नई संघाची अवस्था ४ बाद २४ अशी झाली होती. पण, ऋतुराज गायकवाडच्या तुफान फलंदाजी आणि ड्वेन ब्राव्होच्या जबरदस्त कामगीरीने चेन्नईने मुंबईसाठी १५७ धावांचे लक्ष्य ठेवले. सीएसकेने पिछाडीवर असून देखील सामना जिंकला. या सर्वांचे श्रेय वीरेंद्र सेहवागने एमएस धोनीला देत त्याच्या नेतृत्त्वाची स्तुती केली आहे.
धावफलकावर आव्हानात्मक धावसंख्या उभारल्यानंतर सीएसकेने यशस्वीपणे मुंबईला रोखून धरले. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नसले तरी मुंबई संघाची फलंदाजी मजबूत होती. सेहवागच्या मते, या सामन्यात चेन्नईचा कर्णधार धोनीचे नेतृत्व हे मुख्य आकर्षक बाब राहिली. धोनीला हा खेळाची उत्तम समज आहे आणि घडलेल्या घटनांचा त्याला चांगली जाण आहे तसेच त्याला खेळाचा चांगला अंदाज आहे, असेही सेहवाग म्हणाला.
सेहवाग म्हणाला, ‘एमएस धोनीचे कर्णधारपद उत्कृष्ट होते, यात काही शंका नाही. तो खेळापूर्वी योजना करत नाही. तो मैदानावरील गोष्टींचे निरीक्षण करतो आणि त्यानुसार निर्णय घेतो. तो विरोधी फलंदाजांना पाहतो आणि त्यानुसार गोलंदाजीचे आक्रमण ठरवतो. तो फलंदाजाप्रमाणे गोलंदाजी ठरवतो. जर एखादा फलंदाज वेगवान गोलंदाजी चांगला खेळत असेल तर तो लगेच फिरकीपटू आणतो, परिस्थिती नुसार तो बदल करत असतो.’
वीरेंद्र सेहवागने मुंबईचा स्टार फलंदाज इशान किशनच्या विकेटची आठवण करून दिली आणि सांगितले की, ‘सीएसकेच्या गोलंदाजांनी कर्णधाराच्या क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी केली. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा त्याने ड्वेन ब्राव्होसाठी मैदानावर क्षेत्ररक्षण रचले. एकेरी धाव थांबवण्यासाठी आणि विकेटची शक्यता निर्माण करण्यासाठी चार क्षेत्ररक्षक आतल्या वर्तुळात आणले. आणि अशा प्रकारे त्यांनी इशान किशनची विकेट काढली. खरंच, तो एक चांगला कर्णधार आहे आणि त्याचे गोलंदाज क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी करतात. जर या स्पर्धेमध्ये कोणाकडे तीक्ष्ण मेंदू असेल तर तो एमएस धोनीकडे आहे.’
महत्त्वाच्या बातम्या –
कर्णधारपद सोडण्यापूर्वी विराट आरसीबीला विजेतेपद पटकावून देईल का? चहलने दिले उत्तर
मुंबई-चेन्नई सामन्यानंतर दिसले ‘झारखंड कनेक्शन’; धोनी-ईशान-रॉय यांचा व्हिडिओ व्हायरल
…म्हणून विराटने आरसीबीचे कर्णधारपद सोडले; खास मित्र स्टेनने सांगितले खरे कारण