आयपीएल 2021 मधील 14वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळवण्यात आला. या सामन्यात फाफ डू प्लेसिसच्या शानदार फलंदाजीमुळे सीएसकेने कोलकाताचा 18 धावांनी पराभव केला. परंतु या सामन्यात सीएसकेचा कर्णधार धोनीने यंदाच्या मोसमात मारलेल्या त्याच्या पहिल्याच षटकाराने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
या सामन्यात धोनी आक्रमक फलंदाजी करताना दिसला. या सामन्यातील 18 व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर त्याने एक चौकार आणि एक षटकार ठोकला. या सामन्यात तो 8 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. परंतु यामध्येही त्याने आपल्या जुन्या फलंदाजीची झलक दाखवली. जेव्हा तो फलंदाजी करत होता तेव्हा चाहत्यांनी ट्विटरवर ‘माही मार रहा है’ अशा प्रकारे प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली होती. परंतु केकेआर कडून गोलंदाजी करता आलेल्या आंद्रे रसेलने त्याला बाद करून तंबूत पाठवले.
First six on @IPL 2021 @msdhoni pic.twitter.com/A4Rh7dasL6
— Anbarasan G (@anbu_tamilan07) April 21, 2021
या सामन्यात सीएसकेने कोलकाता विरुद्ध 20 षटकांत एकूण 220 धावा केल्या. ज्यामध्ये फाफ डू प्लेसिसने चमकदार फलंदाजी करत 9 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने 60 चेंडूत नाबाद 95 धावा केल्या. अवघ्या पाच धावांनी त्याचे शतक हुकले. या अगोदर आयपीएल 2019 मध्येही पंजाब विरुद्ध त्याने 95 धावांची खेळी केली होती.
या व्यतिरीक्त पहिल्या तीन सामन्यात चमकदार कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला ऋतुराज गायकवाडही फॉर्ममध्ये आला. त्याने 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 42 चेंडूत 64 धावा करत यंदाच्या मोसमातील पहिले अर्धशतक झळकवले. त्यानंतर मोईन अलीने दोन चौकार आणि दोन षटकार खेचून 12 चेंडूत 25 धावा चोपल्या. त्यामुळे चेन्नईने पहिल्याच डावात तब्बल २२० धावा उभारल्या. या धावसंख्येचा पाठलाग करण्यात कोलकाताला अपयश आले आणि त्यामुळे चेन्नईने हा सामना जिंकत हंगामातील तिसरा विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या:
यजमान झिम्बाब्वेची झुंज अपयशी, पहिल्या टी२० सामन्यात पाकिस्तानचा ११ धावांनी विजयी
धोनीच्या आई-वडीलांच्या आरोग्याबाबत साक्षीने दिले महत्त्वाचे अपडेट्स; म्हणाली
फॅन मुमेंट! तगड्या लढतीनंतर आवेश खानमधील रोहित शर्माचा चाहता झाला जागा, केली ही खास गोष्ट