चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आयपीएलचा पुढील हंगाम खेळणार की नाही, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. धोनीनं आयपीएल 2024 पूर्वी चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद सोडलं होतं. त्यांच्या जागी ऋतुराज गायकवाडला कर्णधार बनवण्यात आलं. आता बातमी येत आहे की, धोनी आयपीएलचा पुढील हंगाम तेव्हाच खेळेल, जेव्हा लिलावापूर्वी एक विशेष नियम लागू होईल.
‘स्पोर्ट्स तक’च्या अहवालानुसार, आयपीएलमध्ये 5 ते 6 खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी मिळाली, तर धोनी पुढील हंगामातही खेळेल. वृत्तानुसार, चार खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी मिळाल्यास सीएसकेचा संघ ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, मथिशा पाथिराना आणि शिवम दुबे यांना रिटेन करू शकतो. यापेक्षा जास्त रिटेनशनला परवानगी मिळाल्यास धोनी पाचव्या किंवा सहाव्या रिटेन्शनच्या रूपात संघात येऊ शकतो.
बीसीसीआय आणि आयपीएल संघांमध्ये आयपीएलच्या रिटेन नियमाबाबत चर्चा सुरू आहे. आयपीएलमध्ये रिटेन करता येणाऱ्या खेळाडूंची संख्या अधिक असावी, असं अनेक संघांना वाटतं. तर काही संघांना राईट टू मॅच कार्डची संख्या वाढवायची आहे. काही संघांना 7-8 राईट टू मार्च वापरायचे आहेत. 31 जुलै रोजी याबाबत बैठक होणार असून त्यानंतर काय निर्णय होतो, हे स्पष्ट होईल.
जर आपण महेंद्रसिंह धोनीबाबत बोललो तर, तो पहिल्या हंगामापासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जनं 5 वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलंय. मात्र आता धोनीचं वय 40 पेक्षा जास्त आहे आणि त्यामुळेच जेव्हा जेव्हा आयपीएलचा हंगाम येतो, तेव्हा त्याच्या निवृत्तीबद्दल चर्चा सुरू होते. गेल्या काही हंगामांपासून धोनीच्या निवृत्तीबाबत आणि तो आयपीएलचा शेवटचा हंगाम कधी खेळणार, याविषयी बरीच चर्चा होत आहे. विशेष म्हणजे, आयपीएल 2024 मध्ये धोनीनं चांगली फलंदाजी करत अत्यंत वेगानं धावा कुटल्या होत्या.
हेही वाचा –
“आम्ही आता अशाच प्रकारे खेळू…”, भारताच्या जबरदस्त विजयानंतर कर्णधार सूर्याची मोठी प्रतिक्रिया
यशस्वीचा धमाका, बिश्नोईच्या फिरकीची जादू….भारतानं श्रीलंकेविरुद्धची मालिका सहज खिशात घातली
क्रिकेटमधील अत्यंत दुर्मिळ घटना, ओव्हर थ्रो न होता आयर्लंडने धावत पूर्ण केल्या 5 धावा – Video