---Advertisement---

CSK vs SRH: चेपॉकमध्ये धोनीने रचला इतिहास..! SRH विरुद्ध मैदानात उतरताच केला ‘हा’ रेकाॅर्ड

On: शुक्रवार, एप्रिल 25, 2025 9:04 PM
---Advertisement---

यंदाच्या आयपीएल हंगामातील (IPL 2025) 43वा चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद (CSK vs SRH) संघात खेळला जात आहे. दरम्यान दोन्ही संघ चेपाॅकच्या स्टेडियमवर आमने-सामने आहेत. या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान एमएस धोनीने मोठी कामगिरी केली. टी20 क्रिकेटमध्ये हा मोठा टप्पा गाठणारा तो चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरला. चेपाॅक स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघात 2 बदल झाले आहेत. रचिन रवींद्र आणि विजय शंकर खेळत नाहीत. त्यांच्या जागी डेवाल्ड ब्रेविस आणि दीपक हुड्डा यांना संधी मिळाली आहे.

हा धोनीचा टी20 क्रिकेटमधील 400वा सामना आहे. यासह तो 400 टी20 सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत सामील झाला आहे. धोनी हा टप्पा गाठणारा चौथा भारतीय क्रिकेटपटूही ठरला आहे. 5 वेळा आयपीएल जिंकणारा कर्णधार धोनी रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि विराट कोहली यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

पण 400व्या टी20 सामन्यात धोनी आपला प्रभाव पाडू शकला नाही. त्याने या सामन्यात 10 चेंडूत केवळ 6 धावा केल्या. दरम्यान त्याने 1 चौकार लगावला. तो हर्षल पटेलच्या चेंडूवर अभिषेक शर्माच्या हातात झेलबाद झाला.

सर्वाधिक टी20 सामने खेळणारे भारतीय क्रिकेटपटू-

रोहित शर्मा – 456
दिनेश कार्तिक – 412
विराट कोहली – 408
एमएस धोनी – 400*

एमएस धोनीची आयपीएल 2025 मधील कामगिरी-

सामने: 9
धावा: 140
स्ट्राइक रेट: 145.83
अर्धशतकं: 0
शतकं: 0
सर्वोत्तम धावा: 30*
फलंदाजी सरासरी: 35.00

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---