fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीयांसाठी व्हिलन ठरलेला माजी क्रिकेटर म्हणतोय, धोनी ५० वर्षातील सगळ्यात भारी कर्णधार

August 29, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

मुंबई । एमएस धोनीने भारतीय क्रिकेटला जे दिले ते प्रत्येक देशावासियांसाठी अभिमानास्पद आहे. आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला त्याने एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्याच्या इतके यश आजपर्यंत कोणत्याही भारतीय कर्णधाराला मिळवता आले नाही. धोनीचे चाहते केवळ भारतातच आहे असे नाही तर जगभर पाहायला मिळतात. सामान्य व्यक्तीपासून ते क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज खेळाडू धोनीचे चाहते आहेत.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल म्हणाले की, “ऑस्ट्रेलियाचे इयान चॅपल, मार्क टेलर, वेस्ट इंडिजचा क्लाईव्ह लॉयड आणि इंग्लंडचा मिशेल बिअरल यांच्यासह धोनी गेल्या 50 वर्षातील सर्वात प्रेरणादायी कर्णधार आहे.”

ग्रेग चॅपेल म्हणाले की, “धोनी हा भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे आणि त्याने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. धोनीला स्पर्धा करणे पसंत आहे आणि मी त्याला बरीच आव्हाने दिली ज्याचा त्याने यशस्वी सामना केला. मला धोनीचा ‘ह्यूमर’ आवडला.”

याच महिन्यात धोनीने 15 ऑगस्टच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. 2005 ते 2007 या काळात चॅपल भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. तेव्हा धोनी संघाचा एक भाग होता आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तो चॅपेल यांच्या प्रशिक्षणाखाली खेळला होता.

चॅपलने धोनीबरोबरच्या अनुभवांबद्दल सांगितले की, “एक व्यक्ती आणि क्रिकेटपटू म्हणून माझा अनुभव खूप सकारात्मक होता.  तो खुल्या मनाचा आणि स्पष्टवक्ता आहे आणि त्यांच्याबरोबर काम करणे खूप सोपे आहे. धोनीमध्ये बनावट विनम्रता नाही आणि आपण हे काम करू शकतो असे वाटत असल्यास तो आत्मविश्वासाने सगळ्या गोष्टी करतो.”

ते म्हणाले की, “त्यांची सर्वात खास गोष्ट म्हणजे तो स्वत: वर विश्वास ठेवत होता. आपल्यातील आत्मविश्वासामुळे तो निराळा दिसत होता. धोनीचा राजकारणावर विश्वास नाही आणि त्याने सरळ व्यवहारावर तसेच सभ्य पद्धतीने आपला प्रतिसाद देण्यावर विश्वास ठेवला. मी पाहिलेल्या सर्व भारतीय कर्णधारांमध्ये एमएस सर्वोत्कृष्ट आहे आणि मी त्याला कर्णधारपदाच्या सर्वोच्च पदावर स्थान देईन.”


Previous Post

एकेवेळी शाळेची फी भरायला पैसे नसलेला क्रिकेटर झालाय करोडपती, आयपीएलमध्ये करतो…

Next Post

चेंडूला स्विंग हवाय; मग वापरा पोट व पाठीचा घाम, या क्रिकेट बोर्डाने काढला अजब नियम

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

पहिल्याच षटकात गोलंदाजी करण्याची ‘त्याला’ नव्हती कल्पना, वॉर्नरने योजनेमागील सांगितले अजब कारण

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

शारजातील सचिनच्या ‘त्या’ वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

सचिन जेव्हा शारजात शानदार खेळला तेव्हा त्याचा सीव्ही कसा होता?

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

आठ वर्षात जमले नाही ते धोनीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केले, पाहा चक्रावून टाकणार रेकॉर्ड

April 22, 2021
Photo Courtesy: Facebook/IPL
IPL

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! कोरोनातून सावरल्याने ‘हा’ सदस्य करणार पुनरागमन

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@sportzhustle
IPL

आयपीएल २०२१ चा भावूक क्षण! रैनाने धरले भज्जीचे पाय, पाहा व्हिडिओ

April 22, 2021
Next Post

चेंडूला स्विंग हवाय; मग वापरा पोट व पाठीचा घाम, या क्रिकेट बोर्डाने काढला अजब नियम

कोरोना पाॅझिटिव्ह खेळाडू, रैनाची माघार व वाद यावर बीसीसीआय काय म्हणतेय पहा

टिंगल सुरु झाली तर! संकटात सापडलेल्या चेन्नई सुपर किंग्जची मुंबई इंडियन्स घेतंय फिरकी?

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.