नवी दिल्ली। भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रसिद्ध शॉट हा २०११ मधील विश्वचषकातील अंतिम सामन्यात तत्कालीन कर्णधार एमएस धोनीने लाँग ऑनच्या वरून ठोकलेला विजयी षटकार आहे. या शॉटमुळे भारतीय संघाचे २८ वर्षांनंतर वनडे विश्वचषकावर दुसऱ्यांदा मोहोर लावण्याचे स्वप्न पूर्ण झाले होते.
धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २००७ साली टी२० विश्वचषक, २०११ साली वनडे विश्वचषक आणि २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. ३९ वर्षीय धोनीने आता आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला शनिवारी (१५ ऑगस्ट) राम राम ठोकला आहे. त्यानंतर आता वानखेडे स्टेडिअममधील एक सीट (जागा) त्याच्या नावावर करण्याबाबत विचार केला जात आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई क्रिकेट असोसिएशन अपेक्स काऊंसिल सदस्य अजिंक्य नाईक यांनी धोनीने निवृत्ती घेतल्याच्या २ दिवसांनंतर सोमवारी एमसीएला एक पत्र लिहून याबाबत प्रस्ताव ठेवला. त्यांनी लिहिले की, “भारतीय क्रिकेटमध्ये धोनीच्या योगदानासाठी त्याचे आभार म्हणून एमसीए स्टँडमधील एक स्थायी सीट म्हणून त्याच्या नावावर केली जाऊ शकते, जिथे २०११ विश्वचषकाचा विजयी षटकार पडला होता. त्यांनी पुढे लिहिले की, आम्ही हे शोधू शकतो की तो चेंडू नेमका कुठे पडला होता.”
पहिल्यांदाच पाठविण्यात आला प्रस्ताव
तरीही भारतात असे पहिल्यांदा होत आहे, जेव्हा कोणत्याही खेळाडूच्या नावावर संपूर्ण स्टँडऐवजी एक विशेष सीट देण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
१९९३ मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या ग्रेट साऊदर्न स्टँडमध्ये एका सीटला पिवळा रंग दिला होता. कारण व्हिक्टोरियाकडून खेळताना न्यू साऊथ वेल्सविरुद्ध सिमोन ओ डोनेलचा १२२ मीटर इतका लांब षटकार याच ठिकाणी पडला होता. २०१३ साली एतिहाद स्टेडिअममधील एका सीटला बिग बॅश लीगची फ्रंचायझी मेलबर्न रेनेगड्सच्या ब्रॅड हॉगच्या सन्मानार्थ लाल रंग दिला होता. जिथे निवृत्ती घेण्यापूर्वी त्याने आपल्या शेवटच्या सामन्यात ९६ मीटरचा षटकार ठोकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-सीपीएल २०२० ड्रीम ११: बार्बाडोस ट्रायडेंट्स विरुद्ध सेंट किट्स आणि नेव्हीस पॅट्रीयॉट्स
-अबब! आयपीएलला २२२ कोटी रुपयांची स्पाॅन्सरशीप देणारी ड्रीम ११ वर्षाला कमावते एवढे रुपये
-आज सीपीएलचा पहिला सामना होतं असलेल्या ब्रायन लारा स्टेडियमवर कोण पडणार भारी?
ट्रेंडिंग लेख-
-धोनी-रैनानंतर ‘हे’ ५ भारतीय खेळाडू देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करु शकतात अलविदा
-‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीचे ५ असे निर्णय, ज्याचा झाला टीम इंडियाला मोठा फायदा
-धोनीच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाकडे आहेत या ५ युवा यष्टीरक्षकांचा पर्याय