---Advertisement---

ऐतिहासिक विजय आणि थालाची भेट… म्हणजे सगळं कसं ‘ओक्केमधी’

On: रविवार, जुलै 10, 2022 10:20 AM
MS-Dhoni-India-Dressing-Room
---Advertisement---

सध्या भारतीय संघ इंग्लंडमध्या टी२० मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी ९ जुलै रोजी खळवला गेला. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाला एक गोड सरप्राईज मिळाले. भारतीय संघाचा माजी आणि सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने भारतीय संघातील खेळाडूंची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. 

टीम इंडियाने शनिवारी एजबॅस्टन येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंडचा ४९ धावांनी पराभव करत मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. भारताच्या या विजयानंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय ड्रेसिंग रुममध्ये पोहोचला. त्याची काही छायाचित्रे बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केली आहेत.

टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये महेंद्रसिंग धोनी त्याच्या जुन्या स्टाईलमध्ये दिसत आहे. हे पाहून असे वाटते की, तो निवृत्त झाला असला तरी. पण, भारतीय क्रिकेटमधील त्याचे महत्त्व अजूनही कमी झालेले नाही.

धोनीने ड्रेसिंग रूममध्ये बराच वेळ भारतीय खेळाडूंशी चर्चा केली. बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन त्याचे म्हणणे अतिशय काळजीपूर्वक ऐकताना दिसत आहे. बीसीसीआयनेही आपल्या ट्विटमध्ये हेच कॅप्शन दिले आहे, “जेव्हा एमएस धोनी बोलतो तेव्हा प्रत्येकजण ऐकतो”.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० मध्ये भारतीय डावाची सुरुवात करणाऱ्या रिषभ पंतलाही हा क्षण दुहेरी आनंदाचा वाटला. एकीकडे भारताने इंग्लंडकडून मालिका जिंकली, तर दुसरीकडे पंतला धोनीला भेटण्याची संधी मिळाली. पंतने स्वत: धोनीसोबतचा फोटो ट्विट केला आणि लिहिले, “दुहेरी विजय, पुढच्या सामन्याची वाट पाहत आहे”. पंत धोनीला आपला आदर्श मानतो.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

भारतीय संघाचा नाद नाय! गेल्या ६ टी२० मालिकेत अविश्वसनिय रेकॉर्ड

आजवर कुणालाही न जमलेला विक्रम बुमराहच्या पदरी! वाचून गर्वाने फुगेल तुमचीही छाती

दुसऱ्या टी२० सामन्यात सामनावीर ठरलेल्या भुवीने दिलीये थेट कपिल देवला टक्कर! जाणून घ्या विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---