---Advertisement---

‘फिनिशर’ धोनीने वनडेत केला आहे असा कारनामा, जो कोणाच करता आला नाही

On: सोमवार, ऑगस्ट 17, 2020 12:57 PM
---Advertisement---

क्रिकेट विश्वात आता एमएस धोनीचा जादुई जलवा दिसू शकणार नाही. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट झाल्याचं त्यानं सांगितलं. धोनीचे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंमध्ये समाविष्ट आहे. धोनीच्या नावावर असा एक विशिष्ट विक्रम आहे, जो आजपर्यंत कोणाला जमलेला नाही.

उत्तम फिनिशन म्हणून संपूर्ण क्रिकेट विश्वात ओळख असलेला धोनी वनडेमध्ये सर्वाधिकवेळा विजयी षटकार मारणारा खेळाडू आहे, म्हणजेच त्याने सर्वाधिक वेळा षटकार मारुन सामना जिंकला आहे.

धोनीने वनडेमध्ये ९ वेळा षटकार मारून सामना जिंकवलेला आहे. जो एक विश्वविक्रम आहे. या षटकरांत २०११ च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात मारलेल्या विजयी षटकाराचा देखील समावेश आहे.

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा जगातील पाचवा फलंदाज आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण ३५९ षटकार मारले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो रोहित शर्मा नंतर दुसरा भारतीय खेळाडू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---