मुंबई। आज(29 आॅक्टोबर) ब्रेबॉर्न स्टेडीयमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध विंडीज यांच्यातील चौथ्या वनडे सामन्यात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला एक खास विक्रम करण्याची संधी होती. पण त्याला हा विक्रम करण्यासाठी फक्त एक धाव कमी पडली.
धोनीने जर आज 24 धावा केल्या असत्या तर त्याने भारताकडून वनडेमध्ये 10 हजार धावा करण्याचा टप्पा पार केला असता. पण तो आज 13 चेंडूत 23 धावा करुन बाद झाला. त्याला केमार रोचने 49 व्या षटकात बाद केले.
त्यामुळे धोनीच्या भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये 9999 धावा झाल्या आहेत. तो वनडेमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा पाचव्या क्रमांकाचा खेळाडू आहे.
भारताकडून याआधी 10 हजार धावांचा टप्पा सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि विराट कोहलीने पार केला आहे. त्यामुळे धोनीला भारताकडून 10 धावा करणारा पाचवा खेळाडू बनण्याची संधी होती. पण आता या विक्रमासाठी धोनीला पुढील सामन्याची वाट पहावी लागणार आहे.
धोनीने भारताकडून आत्तापर्यंत 328 सामन्यात 49.74 च्या सरासरीने 9999 धावा केल्या आहेत. यात त्याने 9 शतके आणि 67 अर्धशतके केली आहेत.
तसेच धोनीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 331 वनडे सामने खेळले आहेत. त्यातील 3 वनडे सामने हे आशियाई एकादश संघाकडून खेळला आहे. या तीन सामन्यात मिळून त्याने 174 धावा केल्या आहेत.
त्यामुळे याआधीच त्याने वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला आहे. पण भारताकडून अजून त्याला हा टप्पा गाठण्यासाठी 1 धावेची गरज आहे.
भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू-
18426 धावा – सचिन तेंडुलकर (463 सामने)
11221 धावा – सौरव गांगुली (308 सामने)
10768 धावा – राहुल द्रविड (340 सामने)
10199 धावा – विराट कोहली (215 सामने)
9999 धावा – एमएस धोनी (328 सामने)
महत्त्वाच्या बातम्या:
–श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुना रणतुंगाला अटक
–पुढच्या सामन्यातील ती चूक धोनीसाठी पडू शकते कारकिर्दीतील सर्वात महाग
–२४७१ खेळाडूंना न जमलेली गोष्ट हिटमॅन रोहित शर्माने करुन दाखवली