भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून एमएस धोनी याला ओळखले जाते. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी-20 विश्वचषक, वनडे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. क्रिकेटच्या मैदानात राज्य करणारा धोनी शिक्षणात मात्र कमजोर असल्याचे सांगितले जाते. धोनीने बी कॉम पर्यंतचे शिक्षण घेतले असले, तरी क्रिकेटमुळे त्याला कधीच नियमितपणे कॉलेजमध्ये उपस्थित राहता आले नाही. धोनीने आता एका कार्यक्रमादरम्यान भारतीय शिक्षण व्यवस्थेविषयी मत मांडले.
एमएस धोनी केरळच्या कासरगोडमध्ये आका कार्यक्रमादरम्यान बोलत होता. धोनी यावेळी त्याच्या शिक्षणाविषयी बोलताना म्हणाला की, “मी कधीच कॉलेजमध्ये गेलो नाहीये. पण मला वाटते मी आयुष्यात चांगली कामगिरी केली आहे.” धोनीच्या मते शिक्षण देणे हे पेशापेक्षा जास्त कला आहे. धोनी शिक्षणतज्ज्ञ आणि प्रध्यापक अब्दुल गफ्पार यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होता. शनिवारी (7 जानाेवारी) पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी धोनीने खास वेळ काढून उपस्थिती लावली होती. कार्यक्रमता धोनीने स्वतःच्या शालेय जीवनाविषयी जास्तकाही सांगितले नाही. मात्र, क्रिकेट कारकिर्दीताला शिक्षणापेक्षा जास्त महत्व दिल्यामुळे तो संतुष्ट असल्याचे मात्र स्पष्ट झाले.
“एका शिक्षकाला त्याच्या विद्यार्थ्यांना समजवून सांगण्यासाठी प्रत्येक गोष्ट सोपी करून सांगावी लागते. प्रत्येक विद्यार्थ्याची समजून घेण्याची क्षणता वेगवेगळी असते आणि तुम्हाला सर्वांना समजून सांगावे लागते. मला वाटते हा एक पेशाच नाही तर कला देखील आहे. मी नेहमीच माझ्या शाळेतील शिक्षकांचा प्रशंसक राहिलो आहे,” असेही धोनी पुढे बोलताना म्हणाला. धोनीचा जवळचा मित्र डॉ. शाजिर गफ्फार यांचे वडील अब्दुल गफ्फार यांची आत्मकथा ‘अनजान साक्षी’चे प्रकाशन करण्यासाठी रांचीवरून केरळच्या कासरगोडला रवाना झाला होता. (MS Dhoni on Indian Education system)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी काय करतोय, हे मला माहितीये…’, पाहा पत्रकाराच्या कोणत्या प्रश्नावर भडकला बाबर आझम
“सूर्यकुमार पाकिस्तानमध्ये जन्मला असता तर…”, माजी कर्णधाराचा पीसीबीवर अप्रत्यक्ष निशाणा