---Advertisement---

आयपीएल २०१३ स्पॉट फिक्सिंगवर एमएस धोनीने अखेर सोडले मौन..

---Advertisement---

आयपीएल २०१३ च्या मोसमाचे विजेतेपद जरी मुंबई इंडियन्सने मिळवले असले तरी तो मोसम मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिला तो स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे. या प्रकरणामुळे नामवंत क्रिकेटपटुंवर बंदी घालण्यात आली, तर संघमालकांना सुद्धा याचा चांगलाच भुरदंड सोसावा लागला.

जस्टिस लोढा पॅनेलने राजस्थान रॉयलच्या श्रीशांत, अजित चंडेला, अंकित चव्हाण या खेळाडूंवरती बंदी आणली तर बुकींच्या संपर्कात असल्याचे कारण देत  राजस्थान रॉयल्स व चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांना दोन वर्ष आयपीएल मधून हद्दपार केले. या सगळ्या प्रकरणावरती विविध क्षेत्रातून टीकेची झोड उडाली पण क्रिकेटमधील बड्या खेळाडूंनी या गोष्टीवरती मौन राखले.

काल तब्बल ६ वर्षांनी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी या प्रकरणावरती ‘रोअर ऑफ द लायन’ या हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या डॉक्यू-ड्रामामध्ये खुलेपणाने बोलला.

तो म्हणाला, ‘यात खेळाडूंची काय चूक ? २०१३ हे माझ्या जीवनातील सर्वात निराशाचे वर्ष होते. याअगोदर एवढा निराश मी कधीच झालो नव्हतो. याअगोदर २००७ जेव्हा आम्ही विश्वचषकात साखळी सामन्यांतच हरलो होतो पण त्यावेळीचे ठीक आहे कारण आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो नव्हतो, पण २०१३ मध्ये सर्व काही वेगळ्याच दिशेला जात होते. जेव्हा सगळेच स्पॉट फिक्सिंग आणि मॅच फिक्सिंग बद्दल बोलत होते आणि देशात हा सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा होता.’

पुढे धोनी म्हणाला, “आम्ही काय चूक केली? शेवटी कळले की चेन्नई सुपर किंग्सला संघाला दोन वर्ष बंदी घालण्यात आली आहे. त्यावेळी द्विधा मनःस्थिती होती कारण कर्णधार म्हणून बऱ्याचशा गोष्टी तुम्ही वैयक्तिक घेत असता आणि प्रश्न फक्त हाच आहे संघाचं काय चुकलं ?नक्कीच आमच्या बाजूने (संघमालकांकडून) मोठी चूक झाली पण काय खेळाडू यामध्ये सहभागी होते? आमची काय चूक? खेळाडू म्हणून या सर्वांमधून जाणे खूप कठीण असते.’

तो प्रसंग आठवताना धोनी म्हणाला, ‘मॅच फिक्सिंगमध्ये खेळाडूंचे बहुमत जास्त असावे लागते. या प्रकरणामध्ये माझे सुद्धा नाव घेतले गेले. माध्यमांनी आणि सोशल माध्यमांनी तर्क लावायला सुरु केले. जर संघ समाविष्ट आहे तर धोनी कशावरुन नसेल? काय हे क्रिकेटमध्ये शक्य आहे? हो हे शक्य आहे. कुणीही स्पॉट फिक्सिंग करू शकतो, अँपायर सुद्धा करू शकतो, फलंदाज सुद्धा आणि गोलंदाज सुद्धा.’

धोनीकरता त्याचे काम हे नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहे तेव्हापण जेव्हा तो भारतीय संघाचा कर्णधार होता. धोनी पुढे म्हणाला, “खूप साऱ्या नकारात्मक गोष्टींनी माझ्या भोवती घेराव घातला होता पण अशा गोष्टींचा मी माझ्या क्रिकेटवरती काहीही परिणाम होऊ दिला नाही. माझ्यासाठी क्रिकेट ही सर्वात मोठी गोष्ट आहे.”

‘एक गोष्ट या सगळ्यांत आणखी कठीण असते आणि ती म्हणजे तुम्ही भारतीय संघाचा कर्णधार म्हणून पत्रकार परिषदेत जाता आणि तिथे मात्र आयपीएलची धूसर रेषा आखलेली असते.’

‘जेव्हा गुरुचे (गुरुनाथ मय्यपन ) नाव समोर आले तेव्हा सगळे म्हणाले झालं सगळं संपलं! अरे पण हे कोणत्या क्षमतेवर? हे विवादात्मक आहे. काय तो संघमालक होता ? काय तो संघाचा मुख्य प्रेरक होता? नक्की तो होता कोण? मला तरी आठवत नाही कुणी गुरूला संघ मालक म्हणून मला भेटवलं ते. आम्ही सर्व त्याला एन. श्रीनिवासन (बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष ) यांचे जावई म्हणूनच ओळखत होतो.’

शेवटी धोनी म्हणाला, ‘चेन्नई सुपर किंग्सशी माझे नाते म्हणजे विवाहविषयक साईटवतरी कुणी तरी जोडीदार मिळाला- पण झालं अरेंज मॅरेज.’

महत्त्वाच्या बातम्या-

फक्त गौतम गंभीरच नाही, तर या ५ क्रिकेटपटूंनीही आजमावले आहे राजकारणात नशीब

चेन्नई सुपर किंग्सकडून एमएस धोनी करणार या क्रमांकावर फलंदाजी

भारतीय क्रिकेटपटूंनी अशा दिल्या होळीच्या शुभेच्छा…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment