---Advertisement---

लाईव्ह आयपीएल सामन्यादरम्यान जागे झाले धोनीचे फुटबॉल प्रेम, सोशल मीडियावर Video होतोय व्हायरल

On: रविवार, मार्च 27, 2022 1:14 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) रणधुमाळी सुरू झाली आहे. आयपीएलचा पंधरावा हंगाम यंदा भारतातील मुंबई आणि पुणे शहरात खेळवला जात आहे. २६ मार्च रोजी आयपीएल २०२२ चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) (CSK vs KKR) यांच्यात झाला. या सामन्यादरम्यान ४ वेळच्या आयपीएल विजेत्या आणि सीएसकेच्या माजी कर्णधार एमएस धोनी याचे फुलबॉलप्रेम पाहायला मिळाले.

धोनीचे (MS Dhoni) फुटबॉल या खेळावरील प्रेम जगापासून लपून राहिलेले नाही. तो बऱ्याचदा फावल्या वेळेत फुटबॉल खेळताना दिसला आहे. नेट्समध्ये क्रिकेटचा सराव करत असतानाही तो कधी-कधी आपले फुटबॉलमधील कौशल्य चाहत्यांना दाखवताना दिसतो. मात्र आता त्याने थेट चालू क्रिकेट सामन्यादरम्यान आपले फुटबॉल कौशल्य दाखवले (Dhoni Played Football)आहे. धोनी वानखेडे स्टेडियमवर केकेआरविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान क्रिकेटच्या चेंडूने फुटबॉल खेळताना दिसला आहे. त्याचा हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

तर झाले असे की, सीएसकेकडून ऍडम मिल्ने केकेआरच्या डावातील चौथे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अजिंक्य रहाणेने बचावात्मक फटका खेळला आणि चेंडू यष्टीमागे उभा असलेल्या धोनीकडे गेला. यावेळी धोनीने हाताने चेंडूला पकडण्याऐवजी त्याला फुटबॉलच्या अंदाजात दोन्ही पायांनी ड्रिबल केले.

त्याच्या या कौशल्याला पाहून ड्वेन ब्रावोही चकित झाला होता. तसेच समालोचकही धोनीचे कौतुक करताना दिसले.

https://twitter.com/DhoniBhakt_/status/1507755031722065923?s=20&t=A9uBp2PcAQToolrg15JIoA

https://twitter.com/sam1998011/status/1507755343706656768?s=20&t=VyAqNLH4bwWzaeYl1HuSkw

धोनीने अर्धशतक झळकावत रचले विक्रमांचे मनोरे
दरम्यान धोनीने केकेआरविरुद्ध शानदार फलंदाजी प्रदर्शन केले होते. त्याने या सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ३८ चेंडूंमध्ये नाबाद ५० धावांची शानदार (MS Dhoni Half Century) खेळी केली. धोनीने केकेआर संघाविरुद्ध केलेले अर्धशतक हे आयपीएलच्या इतिहासातील खास अर्धशतक होते. याचे कारण, आजवर आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये सर्वात वयस्कर भारतीय फलंदाजाने हे अर्धशतक झळकावले होते. याचा अर्थ धोनी हा आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वाधिक वयस्कर भारतीय खेळाडू ठरला आहे. धोनीने वयाच्या ४० वर्ष २६२ दिवसांचा असताना ही कामगिरी केलीये.

महत्त्वाच्या बातम्या-

PBKS vs RCB| दोन नव्या कर्णधारांची कसोटी, अशी असू शकते पंजाब-बेंगलोर संघांची प्लेइंग इलेव्हन

ड्वेन ब्रावो बनला ‘नंबर १’, आयपीएलमधील मोठ्या विक्रमात लसिथ मलिंगाशी साधली बरोबरी

आजचा सामना: केव्हा आणि कसा पाहाल दिल्ली वि. मुंबई सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---