कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इतर देशांप्रमाणे भारतातही लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंनी वेळ घालवण्यासाठी आपला मोर्चा थेट सोशल मीडियाकडे वळवला आहे. परंतु अशामध्ये ‘कॅप्टन कूल’ म्हणजेच भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी एका वेगळ्याच अंदाजात वेळ घालवताना दिसत आहे.
धोनी रांचीतील आपल्या घरात परिवारासोबत वेळ घालवत आहे. तो स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत नाही. परंतु त्याची पत्नी साक्षी धोनी (Sakshi Dhoni) मात्र चाहत्यांना धोनीचे दर्शन घडवून आणते. साक्षीने असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर केला आहे.
साक्षीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये धोनी (MS Dhoni) आपली मुलगी झिवाबरोबर गार्डनमध्ये बसला आहे. यानंतर झिवा (Ziva Dhoni) धोनीला त्यांच्या कुत्र्याला झेल झेलण्याचा सराव करण्यास सांगत आहे. तसेच धोनीदेखील असे करण्यास सुरू करतो. धोनी अनेकवेळा चेंडू हवेत फेकतो आणि त्याचा कुत्रा तो चेंडू पकडतो. धोनीचा कुत्रा अनेकवेळा चेंडू झेलण्यास यशस्वी होतो.
तर काहीवेळा त्याच्याकडून झेल सूटतो. हा संपूर्ण व्हिडिओ साक्षीने शूट केला आहे. यादरम्यान साक्षी धोनीला हे सर्व करण्यापासून थांबवत आहे. तसेच ती म्हणते की, तू खूप उंच चेंडू फेकत आहेस. त्यामुळे त्या कुत्र्याला झेल झेलता येत नाही.
https://www.instagram.com/tv/B_zp0S5j8tr/?utm_source=ig_web_copy_link
धोनीकडे खूप सारे कुत्रे आहेत. तो नेहमी त्यांना प्रशिक्षण देताना दिसतो. धोनीच्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये नेहमी कुत्र्यांचा समावेश असतो. नुकताच धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यामध्ये तो आपल्या घराच्या अंगणात झिवाला बाईकवरून फिरवत होता. तसेच त्याचे कुत्रे त्याला छतावरून पाहत होते.
https://www.instagram.com/p/Bm2oLJTndaY/?utm_source=ig_web_copy_link
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) मागील १० महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. तो आयपीएल २०२०च्या १३ व्या हंगामातून क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-३५ वर्षांपुर्वीची तगडी टीम इंडिया आजच्या टीम कोहलीला ठरली असती भारी
-भारताकडून खेळला केवळ ३ वनडे, आज आहे एका राज्याचा क्रीडामंत्री
-केकेआरसह या तीन क्रिकेट टीमचा किंग खान होणार मालक