कोलकता । सध्या भारतीय संघ कोलकाता वनडे साठी शहरात दाखल झाला आहे. पावसाने हजेरी लावल्यामुळे संघाने गेले तीन दिवस कोणताही सराव केलेला नाही.
येथील इडन गार्डन इनडोअर मैदानावर भारतीय संघाने फ़ुटबाँल आणि व्हॉलीबॉल खेळणे पसंद केले. त्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी कोलकाता शहर फिरायला प्राधान्य दिले. परंतु भारतीय यष्टीरक्षक एमएस धोनीने हे काही न करता आपल्या शूटिंग अर्थात नेमबाजीचा कौशल्यांना धार देण्याचे काम केले.
कोलकाता पोलीसने एक खास व्हिडिओ ट्विटर आणि फेसबुक पेजवर शेअर केला आहे. ज्यात हा महान खेळाडू शूटिंग करताना दिसत आहे. कोलकाता पोलीस आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, “महान खेळाडू एमएस धोनीने खास वेळ काढून आमच्या शूटिंग रेंजवर आज दुपारी नेमबाजीचा सराव केला. त्याची नेमबाजी अफलातून आहे. “
“The great MS Dhoni takes some time off to practice his shooting skills at our state of the art shooting range this afternoon at Police Training School. His accuracy is breathtaking”
@msdhoni sharpens his shooting skills at our state-of-the-art range at Police Training School this afternoon. pic.twitter.com/DCcUIGDqhH
— Kolkata Police (@KolkataPolice) September 20, 2017
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना आज होणार असून या सामन्यावर पावसाचे सावट आहे. भारत मालिकेत १-० असा आघडीवर आहे.