भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असणाऱ्या एमएस धोनीची यावर्षी जानेवारी महिन्यात पदमभूषण पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आज राष्ट्रपती भवनात धोनीला पदमभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.
हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी धोनी त्याच्या लेफ़्टनंट कर्नलच्या युनिफॉर्ममध्ये उपस्थित होता. तसेच त्याने हा पुरस्कारही परेड करत स्वीकारला. धोनीला पहिल्यापासूनच आर्मीची आवड आहे. तो बऱ्याचदा सुट्टीमध्ये जवानांबरोबर वेळ घालवताना दिसून येतो.
पदमभूषण हा देशाचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारा धोनी १० वा क्रिकेटपटू आहे. याआधी हा पुरस्कार लिटिल ब्लास्टर सुनील गावसकर, कपिल देव, राहुल द्रविड, चंदू बोर्डे, प्रोफेसर डीबी देवधर, सीके नायडू, लाला अमरनाथ, विनू मंकड, विजय आनंद यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
धोनीचा या आधी २००९ मध्ये पदमश्री या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.
विशेष म्हणजे २ एप्रिल २०११ म्हणजे आजच्याच दिवशी ७ वर्षांपूर्वी भारताने २८ वर्षांनंतर धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. या विजयानंतरच त्याला लेफ़्टनंट कर्नल ही पदवी देण्यात आली होती.
आज या कार्यक्रमासाठी धोनीची पत्नी साक्षी धोनीही उपस्थित होती.
अशी आहे धोनीला मिळालेल्या पुरस्कारांची यादी:
२००७: राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
२००९: पदमश्री पुरस्कार
२०११: लेफ्टनंट कर्नल पदवी
२०१८: पदमभूषण
President #RamNathKovind confers Padma Bhushan on Cricketer @msdhoni pic.twitter.com/TvSElaVjZ0
— DD News (@DDNewslive) April 2, 2018
Watch Live: President #RamNathKovind confers Padma Shri awards at Rashtrapati Bhavan https://t.co/h4uLUPQbL2 pic.twitter.com/0fA9WsL5ft
— DD News (@DDNewslive) April 2, 2018