कराची | पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज याच्यांत खेळला गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडीजवर १४३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. तब्बल ९ वर्षांच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर पाकिस्तानातल्या कराची मैदानावर आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला.
तीन टी-२० सामन्यांच्या या मालिकेत पाकिस्तानने पहीला सामना जिकुंन मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा हा सर्वात मोठा विजय आहे. वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाने पाच बळी गमावत २०३ धावांचा डोगंर उभा केला.
या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ १३.४ षटकात ६० धावांवर कोसळला.
फखार जमान(३९), हुसैन तलत(४१), सरफराज अहमद(३८) आणि शोएब मलिक (३७) यांच्या दमदार खेळींच्या जोरावर पाकीस्तानने २०३ धावांपर्यंत मजल मारली.
पाकिस्तान संघ हा सध्या टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.
Biggest margin of win in a T20I:
172 SL v Ken, Joburg, 2007
143 Pak v WI, Karachi, 2018 *
130 SA v Sco, Oval, 2009
119 NZ v WI, Mt Maunganui, 2018
116 Eng v Afg, Colombo, 2012#PAKvWI— Deepu Narayanan (@deeputalks) April 1, 2018