---Advertisement---

कॅप्टनची जबरदस्त आकडेवारी पाहून तुम्हीही म्हणाल, सचिननंतर रोहितच! तिशीनंतर गाजवलं मैदान

Rohit Sharma
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका शेवटच्या टप्प्यात आहे. शुक्रवारी (8 मार्च) धरमशाला कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा याने झंजावाती शतक टोकले. कसोटी क्रिकेटमधील हे रोहितचे 18वे शतक होते. रोहितच्या साथीने गिल देखील खेळपट्टीवर टिकून राहिला आणि शतक केले. या दोघांच्या खेळीमुळे भारताने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात इंग्लंडची आघाडी मोडून काढली. यादरम्यान रोहितच्या नावावर एक खास विक्रम नोंदवला गेला.

रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या 36 वर्षांचा आहे. त्याने भारतासाठी शुक्रवारी (8 मार्च) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 48वे शतक ठोकले. जून 2007 मध्ये भारतासाठी पहिला सामना खेळणारा रोहित सुरुवातीच्या कालात संघातून आत बाहेर होत राहिला. पण मागच्या दशकात भारतीय संघात त्याल एक वेगळे महत्व मिळाले आहे. दोन वर्षांपासून रोहित भारताचा नियमित कर्णधार देखील आहे. रोहितने कारकिर्दीत केलेल्या 48 शतकांपैकी 35 शतके ही वयाच्या तिशीनंतर केले आहेत. वायच्या 30व्या वर्षानंतर सर्वाधिक शतके करणाऱ्यांच्या यादीत रोहितने माजी दिग्गज सचिन तेंडुलकर याची बरोबरी केली. श्रीलंकेचा माजी दिग्गज कुमार संगकारा हा या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर रोहितने तिसरा क्रमांक मिळवला आहे.

वयाच्या 30व्या वर्षांनंतर सर्वाधिक शतके करणारे फलंदाज
43 – कुमार संगकारा
36 – मॅथ्यू हेडन
36 – रिकी पाँटिंग
35 – रोहित शर्मा
35 – सचिन तेंडुलकर

धरमशाला कसोटीसाठी दोन्ही संघ –
भारताची प्लेइंग इलेव्हन – यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल (पदार्पण), रविंद्र जडेजा, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.
(Rohit equaled Sachin Tendulkar in the list of most centuries scored after age of 30 years)

महत्वाच्या बातम्या – 
धरमशाला कसोटीचा चार्ज कॅप्टन रोहितच्या हाती! दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात ठोकलं शतक
WPL 2024 Point Table – मुंबई इंडियन्स विजयासह टॉप 2 मध्ये, प्लेऑफ्ससाठी ‘हे’ तीन संघ स्पर्धेत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---