क्रिकेटटॉप बातम्या

धरमशाला कसोटीचा चार्ज कॅप्टन रोहितच्या हाती! दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात ठोकलं शतक

रोहित शर्मा धरमशाला कसोटीत चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या कर्णधाराने आपले शतक पूर्ण केले. भारतासाठी रोहितच्या शतकावेळी भारतीची धावसंख्या पहिल्या डावा 1 विकेट्सच्या नुकसानावर 258 धावा होती. नाणेफेक गमावल्यानंतर भारताला प्रथम गोलंदाजी करावी लागली. पण इग्लिश कर्णधाराने प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय भारतीय केळाडूंनी चुकीचा ठरवला.

भारतासाठी या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशश्वी जयस्वाल यांनी डावाची सुरुवात केली. सलामीवीर यशस्वी आणि रोहितने गुरुवारी (7 मार्च) म्हणजेच सामन्याच्या पहिल्या दिवशी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण अर्धशतक केल्यानंतर जयस्वाल तंबूत परतला. त्याने 58 चेंडूत 57 धावांची खेळी केली. शोएब बशीर याच्या चेंडूने चकवा दिल्यानंतर यष्टीरक्षक बेन फोक्सने स्टंपिंग करून जयस्वालला तंबूत धाडले. असे असले तरी, रोहित शर्मा (Rohit Sharma) खेळपट्टीवर टिकून राहिला.

दुसऱ्या दिवशी रोहितने वैयक्तिक 52 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र संपण्याआधीच कर्णधारने आपले शतक पूर्ण केले. रोहितच्या कसोटी कारकिर्दीतील 18वे शतक होते. 155 चेंडूत त्याने आपल्या 100 धावा पूर्ण केल्या. यात 13 चौकार, तर 3 षटकार सामील होते. (Rohit Sharma’s century in Dharamsala Test)

धरमशाला कसोटीसाठी दोन्ही संघ –
भारताची प्लेइंग इलेव्हन – यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल (पदार्पण), रविंद्र जडेजा, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.

महत्वाच्या बातम्या – 
WPL 2024 Point Table – मुंबई इंडियन्स विजयासह टॉप 2 मध्ये, प्लेऑफ्ससाठी ‘हे’ तीन संघ स्पर्धेत
डॉन ब्रॅडमननंतर यशस्वीचाच नंबर! क्रिकेटच्या ‘या’ खास लिस्टमध्ये मिळवलं स्थान

 

Related Articles