---Advertisement---

IND vs ENG । धरमशाला कसोटीत भारताचे वर्चस्व! दुसऱ्या दिवशी इंग्लंडवर 255 धावांची आघाडी

_Rohit Sharma shubman gill
---Advertisement---

भारतीय संघाने धरमशाला कसोटीच्या दुसऱ्या दिवसाखेर 255 धावांची आघाडी घेतली आहे. 1 बाद 135 धावांपासून पुढे भारताने शुक्रवारी (8 मार्च) खेळायला सुरुवात केली. त्यावेळी कर्णधार रोहित शर्मा (52*) याने अर्धशतक केले होते. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी रोहित शर्माने शतक केले. त्याचसोबत शुबमन गिल यानेही शतकी खेळी केली. सरफराज खान आणि देवदत्त पडिक्कल या युवा खेळाडूंच्या बॅटमधून देखील अर्धशतकी खेळी निघाली. दुसऱ्या दिवसाखेर भारताची धावसंख्या 8 विकेट्सच्यानुकसानावर 478 धावा आहे.

रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी धरमशाला कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपली आपली शतके पूर्ण केली. पहिल्या दिवसाखेर रोहित 52*, तर गिल 26* धावांवर खेलत होते. दुसऱ्या दिवशी रोहितने 162 चेंडूत 103 धावा करून विकेट गमावली. तर गिल 150 चेंडूत 110 धावा करून तंबूत परतला. चौथ्या क्रमांकावर आलेल्या देवदत्त पडिक्कल याने 103 चेंडूत 65, तर सरफराज खान याने 60 चेंडूत 56 धावा कुटल्या.

अष्टपैलू रविंद्र जडेजा 15, यष्टीरक्षक फलंदाज ध्रु जुरेल 15, तर रविचंद्रन अश्विन शुन्यावर बाद झाला. कुलदीप यादव 27*, तर जसप्रीत बुमराह 19* धावांसह खेळपट्टीवर कायम आहेत. तत्पूर्वी पहिल्यादिवशी सलामीवीर यशस्वी जयस्वाल (57) यानेही अर्धशतक केले होते.

इंग्लंडसाठी कसोटी सामन्याच्या या पहिल्या डावात फिरकीपटू शोएब बशीर याने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या आहेत. पण सर्वाधिक धावाही त्यानेच खर्च केल्या आहेत. बशीरने 44 षटकांमध्ये 170 धावा दिल्या असून चार विकेट्स घेतल्या आहेत. फिरकीपटू टॉम हार्टली याने दोन विकेट्स घेतल्या. पण यासाठी त्याला 39 षटके गोलंदाजी करावी लागली आणि 126 धावाही खर्च झाल्या.

कर्णधार बेन स्टोक्स जवळपास आठ महिन्यांनंतर शुक्रवारी गोलंदाजीसाठी आळा. गोलंदाज म्हणून पुनरागमन करताना पहिल्याच चेंडूवर त्याने रोहित शर्माचा त्रिफळा उडवला. रोहित आणि गिल यांच्यातील 171 धावांची भागीदारी स्टोक्सने पहिल्याच चेंडू तोडली. स्टोस्कने 5 षटकात 17 धावा खर्च केल्या आणि एक विकेट घेतली. दिग्गज जेम्स अँडरसन यानेही 14 षटकात 59 धावा खर्च करून एक विकेट घेतली. मार्क वूड ला मात्र अध्याप अकही विकेट गमावली नाही. (At the end of the second day of the Dharamsala Test, the Indian team led by 255 runs)

धरमशाला कसोटीसाठी दोन्ही संघ –
भारताची प्लेइंग इलेव्हन – यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल (पदार्पण), रविंद्र जडेजा, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.

महत्वाच्या बातम्या – 
टीम इंडियानं इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवलं, देवदत्त पडिक्कलचं पदार्पणातच अर्धशतक
लोकसभा निवडणूक लढवणार मोहम्मद शमी! ‘हा’ पक्ष देणार पश्चिम बंगालमधून खासदार होण्याची संधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---