---Advertisement---

आठ महिन्यात पहिला चेंडू टाकला आणि थेट रोहितचा त्रिफळाच उडवला! धरमशालेत स्टोक्सचं जोरदार कमबॅक

Ben Stokes Rohit Sharma
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना धरशालामध्ये खेळला जात आहे. शुक्रवारी (8 मार्च) भारतासाठी वरच्या फळीतील रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी शतकी खेळी केली. दोघांच्या शतकामुळे शुक्रवारी पहिल्या सत्रात भारताने 1 बाद 264 धावा केल्या. पण इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स मोठ्या काळानंतर गोलंदाजीला आला आणि पहिल्याच चेंडूवर रोहितचा त्रिफळा उडवला.

भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. धरमशाला कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा पहिला डावत 218 धावांवर गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात भारतासाठी सुरुवातीच्या तिन्ही फलंदाजांनी महत्वपूर्ण धावांचे योगदान दिले. सलामीवीर यशस्वी जयस्वाल वैयक्तिक 57 धावांवर गुरुवारी (7 मार्च) बाद झाला. तर दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा (Rohit Sharma) 103, तर शुबमन गिल (Shubman Gill) 110 धावा करून बाद झाला.

शुक्रवारी भारतीय संघ फलंदाजीला आला तेव्हा रोहितची धावसंख्या 52, तर गिल 26 धावांवर होता. दुसऱ्या विकेटसाठी या दोघांमध्ये 244 चेंडूत 171 धावांची भागीदारी झाली. रोहित आणि गिलने इंग्लिश गोलंदाजांचा अक्षरशः घाम काढला. जेम्स अँडरसन, मार्क वुड, टॉम हार्टली आणि शोएब बशीर या चौघांनाही रोहित-गिलला बाद करता येत नव्हते. संघ अडचणीत असल्याचे पाहून कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) गोलंदाजीला आला. दुखापतीच्या कारणास्तव स्टोक्सने जून 2023नंतर एकही चेंडू टाकला नव्हता. पण पुन्हा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर स्टोक्सला पहिल्याच चेंडूवर रोहितची विकेट मिळाली. भारतीय कर्णधार स्टोक्सने टाकलेल्या चेंडूला बॅट देखील लावू शकला नाही. चेंडू रोहितला चकवा देत थेट स्टंप्समध्ये घुसला. हा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

(Ben Stokes bowled after 8 months and clean bowled Rohit Sharma in the very first ball)

धरमशाला कसोटीसाठी दोन्ही संघ –
भारताची प्लेइंग इलेव्हन – यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल (पदार्पण), रविंद्र जडेजा, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.

महत्वाच्या बातम्या – 
धरमशाला कसोटीचा चार्ज कॅप्टन रोहितच्या हाती! दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात ठोकलं शतक
अफगाणिस्तानचा दिग्गज खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मैदानावर ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---