---Advertisement---

जशा शुभेच्छा सेहवागने धोनीला दिल्या, तशा कुणीच देऊ शकलं नाही

On: रविवार, ऑगस्ट 16, 2020 1:29 PM
---Advertisement---

मुंबई । भारताचा दिग्गज यष्टिरक्षक फलंदाज एम एस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. सैनिकी स्टाईलमध्ये इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन त्याने याची घोषणा केली. धोनीने आपल्या संपूर्ण प्रवासाचा एक व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की, संध्याकाळी 7.29 पासून त्याला निवृत्त घेतली आहे असे समजावे.

धोनीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटसह इतर क्षेत्रातील दिग्गजांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. यात माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने हटक्या स्टाइलमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.

सेहवागने धोनीसाठी लिहिले की, “ओम फिनिशाय नमः त्याच्यासारखे कोणी नव्हते, कोणीही एमएससारखे होणार नाही. खेळाडू येतच राहतात, परंतु त्यांच्यासारखे कुणीही होणार नाही. धोनी कुटुंबातील सदस्यासारखा इतरांशी संपर्क ठेवायचा. ऐतिहासिक आठवणींसाठी तुझे आभार आणि तुला प्रेरणादायी आयुष्यासाठी शुभेच्छा.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---