भारतीय संघाने २०११ साली मिळवलेल्या ऐतिहासिक वर्ल्डकप विजयाला आज १० वर्ष पूर्ण झाली. भारतीय संघाने तब्बल २८ वर्षांनी वर्ल्डकप विजेतेपद पटकाविले होते. विशेष म्हणजे मायदेशात झालेला हा वर्ल्डकप जिंकल्याने संघाचा आणि चाहत्यांचा विजयाचा आनंद दुप्पट झाला होता.
या विजयाच्या दशकपूर्ती निमित्त त्यावेळचा भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनी याचा एक खास व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत त्याने वर्ल्डकप विजयाच्या आठवणींना उजाळा देतांना वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील खेळीबद्दल भाष्य केले आहे.
गल्फ ऑईल कंपनीने घेतला हटके इंटरव्ह्यू
धोनीचा हा व्हिडिओ गल्फ ऑईल कंपनीच्या माध्यामातून समोर आला आहे. हटके कल्पना असलेला हा व्हिडिओ आहे. ज्यात २००५ साली नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला धोनी २०२१ सालच्या अनुभवी धोनीचा इंटरव्ह्यू घेतांना दिसून येत आहे. यात तरुणपणीच्या धोनीने अनुभवी धोनीला त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी कोणती, असा प्रश्न विचारला आहे.
यावर अनुभवी धोनीने देखील खास उत्तर दिले आहे. यावर २०११ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात खेळलेली नाबाद ९१ धावांची खेळी सर्वोत्तम असल्याचे धोनीने सांगितले आहे. “वर्ल्डकप फायनल. तो सामना जिंकवून देण्यातील गंमत काही औरच होती. २०११, वानखेडे स्टेडियम, म्हणजे आमच्या मेहनतीचे फळ.”
गल्फ ऑईल कंपनीच्या या विशेष व्हिडिओमुळे धोनीच्या मनातील भावना प्रथमच चाहत्यांसमोर आल्या आहेत.
@msdhoni from 2021 met his younger self from 2005 and they had quite a conversation about consistency. Here’s a sneak peek into what happened. Dhoni fans, cricket fans, bikers, click https://t.co/fp5XiWzmle to join us on April 2nd at 3 pm to know more! #GulfDhoniXDhoni pic.twitter.com/Yd35WajTwB
— Gulf Oil India (@GulfOilIndia) March 31, 2021
दरम्यान, एमएस धोनीने मागील वर्षी १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आता तो फक्त आयपीएलच्या माध्यामातून मैदानावर खेळतांना दिसेल. यंदाही येत्या ९ एप्रिलपासून सुरू होणार्या आयपीएल मध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करतांना दिसणार आहे. पुन्हा एकदा ‘व्हिटेंज धोनी’ची झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
धोनीच्या एका षटकराने जर विश्वचषक जिंकून दिला असेल, तर युवराजने ६ जिंकलेत, गंभीरची तिखट प्रतिक्रिया
शाब्बास भावा..!! पाकिस्तानविरुद्ध खेळणार का? खलील अहमदने एका वाक्यात जिंकले कोट्यवधी भारतीयांचे हृदय
बिहारच्या या युवा खेळाडूचा समावेश झाला दिल्ली कॅपिटल्सच्या संघात, वाचा संपूर्ण कारकीर्द