इंडियन प्रीमियर लीगचा ११ वा सामना पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये पार पडला. या सामन्यात रविंद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली सीएसकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात चाहत्यांना पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीचा विंटेज अवतार पाहायला मिळाला. धोनीने ज्या पद्धतीने पंजाब किंग्जचा फलंदाज भानुका राजपक्षेला धावबाद केले, त्यावरुन त्याने चाहत्यांना जुन्या धोनीची आठवण करुन दिली. धोनीने केलेल्या या धावबादचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
ही घटना पंजाब किंग्जच्या डावाच्या दुसऱ्या षटकात घडली, जेव्हा राजपक्षेने ख्रिस जॉर्डनच्या षटकाचा दुसरा चेंडू खेळला आणि तो एका धावेसाठी धावला. यावेळी शिखर धवनने त्याला अर्ध्या खेळपट्टीवरुन परत पाठवले. इतक्यात जॉर्डनने चेंडू पकडला आणि थेट यष्टीवर मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू पुढे गेला आणि मग वेगाने धोनी कव्हरसाठी धावला आणि चेंडू पकडला, तो अचूक स्टंपवर फेकला.
चेंडू स्टंपला लागेपर्यंत राजपक्षे क्रीजपर्यंत पोहोचू शकला नाही आणि धोनीच्या हसण्याने तो धावबाद झाल्याचे सांगितले. पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला आणि रिप्लेमध्ये राजपक्षे क्रीजपासून दूर असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. या घटनेचा व्हिडीओ चाहते सोशल मीडियावर प्रचंड शेअर करत आहेत आणि माहीबद्दल प्रसंशनीय प्रतिक्रीया देखील केल्या जात आहेत.
https://twitter.com/SumanDas_07/status/1510622309559980037?s=20&t=DpmcIDAXDE0IvjJ0Ob3_Hg
https://twitter.com/IPL/status/1510621771162038280?s=20&t=DpmcIDAXDE0IvjJ0Ob3_Hg
https://twitter.com/AbdullahNeaz/status/1510621816301436930?s=20&t=-vM6WYVYK1ix_iw7ojtZbg
https://twitter.com/MohitPa64973338/status/1510626915098705921?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1510626915098705921%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fms-dhoni-run-out-of-bhanuka-rajapaksa-in-csk-vs-pbks-ipl-2022-match-watch-video-96992
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पंजाब किंग्जने दोन विकेट्स लवकर गमावल्या, मात्र त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनची आतिषबाजी पाहायला मिळाली. बाद होण्यापूर्वी लिव्हिंगस्टोनने ३२ चेंडूंत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६० धावा केल्या. लिव्हिंगस्टोनशिवाय शिखर धवननेही २४ चेंडूत ३३ धावांची खेळी केली. तसेच जितेश शर्माने २६ धावा केल्या. चेन्नईकडून जाॅर्डनने २ विकेट्स घेतल्या.
सीएसके संघाने आत्तापर्यंत ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. सीएसके या हंगामात काही खास कामगिरी करु शकला नाही. पहिल्या दोनही सामन्यात संघााला अपयश आले आहे. तर पंजाबने एक सामना जिंकला आहे तर एका सामन्यात संघाला अपयश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टॉम लॅथमने वाढदिवस बनवला आणखी खास, तब्बल २४ वर्षांपूर्वीचा सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम काढला मोडीत
थाला @३५०! धोनीचा टी२०त ‘भीमपराक्रम’, मैदानावर पाऊल ठेवताच शिरपेचात अजून एक मानाचा तुरा
CSK vs PBKS | कर्णधार जडेजाने जिंकली नाणेफेक, पंजाबकडून २ खेळाडूंचे पदार्पण; पाहा उभय संघ