भारतीय संघाचा माजी कर्णधार त्याच्या एका वेगळ्याच शैलीसाठी जगभरात ओळखला जातो. एक चतुर कर्णधार, अतिशय हुशार यष्टीरक्षक, स्फोटक फलंदाज व शांत डोक्याचा माणूस ही धोनीची जगाला ओळख आहे.
कर्णधार, यष्टीरक्षक व फलंदाज म्हणून धोनीच्या नावावर अनेक विक्रमही आहेत. परंतु त्याच्या नावावर गोलंदाज म्हणूनही एक विक्रम आहे. ५०० किंवा त्याहुन अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळून केवळ १ विकेट घेणारा तो एकमेव खेळाडू आहे. श्रीलंकेच्या कुमार संगकाराने ५९४ सामन्यात ० विकेट्स घेतल्या आहेत.
धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९० कसोटी, ३५० वनडे व ९८ टी२० सामने खेळला आहे. त्यात त्याने वनडे क्रिकेटमध्ये २००९ आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या ट्रॅविस डाॅवलिन या फलंदाजाना त्रिफळाचीत केले होते. या सामन्यात २ षटके गोलंदाजी करत १४ धावा दिलेल्या धोनीने १ विकेट घेतली होती. भारताने हा सामना ७ विकेट्सने जिंकला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-७ बाप-लेकांच्या जोड्या, ज्यांनी गाजवलं आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट
-टॉप-५: या खेळाडूंच्या नावावर आहेत शतकांपेक्षा जास्त झिरो
-धोनीच्या त्या ऐतिहासिक षटकारावर गंभीरने साधला निशाना, केली जोरदार टीका






