सध्या भारताच्या माजी कर्णधार एम.एस. धोनीला त्याच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यातील संथ फलंदाजीमुळे मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. परंतु काही दिवसांपूर्वी धोनीने स्वतःला वाईनची उपमा देत आपण अधिकाधिक प्रगल्भ फलंदाज बनत चाललो असल्याचं बोललं होत.
यासाठी धोनीच्या तिशीच्या आधीच्या कारकिर्दीची आणि त्यानंतरच्या कारकिर्दीची आकडेवारीत तुलना करणे क्रमप्राप्त होते. आणि आकडेवारीवरून तरी धोनीचं हे म्हणणं नक्की खरं आहे असं वाटत.
वयाच्या तिशीपर्यंत
३ दिवसांनी अर्थात ७ जुलै रोजी ३६ वर्षांचा होत आहे. धोनीच्या एकदिवसीय कारकिर्दीचा प्रारंभ झाला तो २३ डिसेंबर २००४ रोजी. वयाची तिशी पार करेपर्यंत या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण एकदिवसीय खेळले १६६. या १६६ सामन्यांत त्याने ४८.७८ च्या सरासरीने धावा केल्या आहेत ६०४९.
वयाच्या तिशीनंतर
वयाच्या तिशीनंतर या खेळाडूने आजपर्यंत एकूण ८९ सामने खेळताना धावा केल्या आहेत ३४४७. महत्त्वाचं म्हणजे यात धोनीची सरासरी आहे ५६.६१ जी आधीच्या सरासरीपेक्षा तब्बल ८ने जास्त आहे. तर धोनीचा स्ट्राइक रेट सुद्धा ३ने वाढून तिशीनंतर तो ९०.८१ झाला आहे.
धोनीची एकदिवसीय सामन्यातील कामगिरी
|
सामने | धावा | सरासरी | स्ट्राइक रेट |
वयाच्या तिशीपर्यंत |
१६६ |
६०४९ |
४८.७८ |
८७.५४ |
वयाच्या तिशीनंतर |
८९ | ३४४७ | ५६.६१ |
९०.८१ |