---Advertisement---

बिश्नोईने क्लीन बोल्ड करताच धोनीचा चढला पारा, रागात उच्चारला अपशब्द? व्हिडिओ व्हायरल

---Advertisement---

भारताचा माजी क्रिकेटपटू एमएस धोनीला त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. क्रिकेट विश्वात तो ‘कॅप्टन कूल’ म्हणून तो सर्व ज्ञात आहे. परंतु, माणूस म्हटलं की त्याला कधीतरी राग हा येतोच. असेच काहीसे एमएस धोनी घडले होते, जेव्हा त्याने आयपीएल २०२१ दुसऱ्या टप्प्यात पंजाब किंग्सविरुद्ध सामना खेळत होता.

पंजाब किंग्सविरुद्ध नाणेफेक हरल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अंबाती रायुडू बाद झाल्यानंतर एमएस धोनी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला, पण तो पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. एमएस धोनीने १५ चेंडूत फक्त १२ धावा केल्या होत्या, त्यादरम्यान त्याने २ चौकार मारले, पण एकही षटकार मारू शकला नव्हता. पंजाब किंग्सचा युवा गोलंदाज रवी बिश्नोईने धोनीला त्रिफळाचीत केले होते.

जेव्हा रवी बिश्नोईने एमएस धोनीची विकेट घेतली, तेव्हा तो चिडलेला दिसला. कॅमेरामॅनने जेव्हा धोनीवर कॅमेरा घेतला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपले गेले. त्याचे ओठ काळजीपूर्वक वाचल्यानंतर असे दिसते की त्याने एक अपशब्द उच्चारला असावा. धोनीच्या या कृतीमुळे क्रिकेट चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. समाज माध्यमावर ट्विट आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

एका चाहत्याने व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, धोनीही आता बेन स्टोक्सची आठवण काढत आहे.

https://twitter.com/mscmedia2/status/1446106568970309637

https://twitter.com/Keshavjaihind/status/1446085143236538373

एका चाहत्याने एक वेलकम चित्रपटातील एक मिम शेअर केले आहे, त्यात उदय आणि मजनू यातील प्रसिद्ध संवाद आहे आणि कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘मी सध्या धोनीची फलंदाजी पाहताना.’

आयपीएल २०२१ प्लेऑफसाठी चार संघ पात्र ठरले आहेत. यातील दिल्ली कॅपिटल्स पहिल्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या स्थानी, तर विराट कोहलीचा आरसीबी संघ तिसऱ्या स्थानी होता. या तिन्ही संघांनी आधीच आपले स्थान पक्के केले होते, मात्र चौथ्या स्थानासाठी उत्सुकता होती. यात कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

टी२० विश्वचषक तोंडावर असताना पाकिस्तान संघात ३ मोठे बदल, एक खेळाडूही दुखापतीमुळे संघाबाहेर

ठरलंच समजायचं का? टी२० विश्वचषकात ‘हा’ मुंबईकर सलामीला फलंदाजी करणे निश्चित, खुद्द विराटने दिलेत संकेत

आरसीबीचे नेतृत्त्वपद सोडण्याबाबत कोहलीने जवळच्या मित्राशी केली होती चर्चा, स्वत: केला उलगडा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---