नवी दिल्ली । एमएस धोनीने पुन्हा आपल्या वडत्या चेन्नई सुपर किंगकडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज आयपीएलच्या प्रशासकीय समितीने दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.
“आयपीएलमधील संघ २०१८मध्ये आपल्या संघातील ५ खेळाडूंना कायम करू शकतात. लिलाव होण्यापूर्वी आणि लिलावात राइट टू मॅच वापरून जास्तीतजास्त ५ खेळाडू संघात कायम ठेवता येऊ शकते.” असे बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी म्हणाले.
“चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयलचे संघ ह्या दोन्ही प्रकारांनी संघातील खेळाडू कायम ठेवू शकतात. “
यावेळी संघ लिलावात ८० कोटी रुपये खर्च करू शकतात जे गेल्यावर्षी ६६ कोटी रुपये एवढे होते. यावेळी चेन्नई धोनी, रैना, जडेजा, ब्रावो आणि ब्रेंडन मॅक्कुलम सारख्या खेळाडूंना कायम ठेवू शकते.
२०१३ मधील आईपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणावरून चेन्नई आणि राजस्थानला दोन वर्ष बंदी घालण्यात आली होती.