इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये संघ एकापेक्षा एक प्रदर्शन करत आहेत. एमएस धोनी मागच्या वर्षी सीएसकेच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला होता. पण रविंद्र जडेजाने कर्णधारपद सोडल्यानंतर धोनीने ही जबाबदारी पुन्हा स्वीकारली. यावर्षीही धोनीच सीएसकेचे कर्णधारपद सांभाळत आहे. असे असले तरी, धोनी यावर्षीच्या हंगामानंतर आयपीएलमधून निवृत्ती घेईल, असा अंकंदरीत अंदाजा व्यक्त केला जात आहे. भारताचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांनाही असेच वाटते की, धोनीने यावर्षी आपली शेवटची आयपीएल खेळावी.
1983 मध्ये भारताला पहिला विश्वचषक मिळवून देणारे दिग्गज कपिल देव (Kapil Dev) यांनी एमएस धोनी (MS Dhoni) याच्याविषयी आपले मत व्यक्त केले. कपिलच्या मते धोनी वय झाले असले तरीही चांगले प्रदर्शन करत आहे. मात्र, आता त्याने थांबले पाहिजे. भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव म्हणाले की, “धोनीने स्वतःला एक ब्रांड म्हणून स्थापित केले आहे. पण हे मान्य केले पाहिजे की, 40च्या वयात तुम्ही 25 वर्षांचे वाटू शकत नाही. होय, 25वर्षीय खेळाडूप्रमाणे उत्साह दिसून येतो, पण शरीर त्या पद्धतीने साथ देत नाहीये. त्याला गुडघ्यांचा त्रास आहे, कंबर देखील दुखत आहे. पण तरीदेखील तो सामना यांगला नियंत्रित करतो. यासाठी त्याचे जितके कौतुक केले जाईल तितके कमीच आहे.”
कपिल देव पुढे म्हणाले की, “धोनी पहिल्यासारखा खेळू शकत नाही, पण आजही त्याच्यातील काही गोष्टी पहिल्यासारखा दिसतात. चालू हंगामात त्याने आतापर्यंत असे प्रदर्शनही केले आहे. चालू हंगामानंतर धोनीने थांबले पाहिजे. कारण त्याचे प्रदर्शन घसरले, तर कुणालाच चांगले वाटणार नाही. त्याने भारतीय क्रिकेट संघासाठी खूपकाही केले आहे. पण आता त्याने या सर्वाला गुड बाय केले पाहिजे, असे मला वाटते.”
दरम्यान, धोनी आधी म्हटल्याप्रमाणे यावर्षी त्याला आपल्या होम ग्राउंडवर चाहत्यांसमोर निवृत्तीची संधी मिळणार आहे. मागच्या तीन वर्षांत कोरोनामुळे आयपीएल भारताबाहेर खेळवली गेली आणि धोनीला ही संधी मिळाली नव्हती. यावर्षी त्याच्या निवृत्तीच्या चर्चा जरी जोरात असल्या, तरी धोनी मात्र निवृत्तीच्या विचारात दिसत नाहीये. नुकत्याच खेळलेल्या एका सामन्यात धोनीने याविषयी संकेत देखील दिले. समालोचक डॅनी मॅरिसन यांनी धोनीला निवृत्तीबाबत उल्लेख केला. यावर धोनी म्हणाला की, “हा माझा शेवटचा आयपीएल हंगाम आहे, असे तुम्हीच ठरवले आहे. मी असा कोणताच विचार केला नाहीये.” धोनीच्या विधानानंतर चाहत्यांना तो पुढच्या हंगामात खेळताना पाहण्याची अपेक्षा आहे. (‘MS Dhoni should retire from IPL’, said Kapil Dev)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सीएसके आणि जडेजातील मतभेत पुन्हा चव्हाट्यावर, सोशल मीडियावर लाईक केली ‘ही’ पोस्ट
हो-हो, नाही-नाहीच्या नादात विस्फोटक फलंदाज 5 धावांवर तंबूत, रहाणेने केलेल्या Runoutचा व्हिडिओ पाहाच