भारतीय क्रिकेट संघाला लाभलेला सर्वात यशस्वी कर्णधार अशी ओळख एमएस धोनी याची आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. 2020 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी आयपीएलमध्ये तो अजूनही खेळत आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत धोनी रांचीमध्ये बाईक चालवताना दिसत आहे.
एमएस धोनी (MS Dhoni) याला वाहनांची असणारी आवड कुणापासूनच लपून राहिली नाहीये. त्याने आपल्या राहत्या घरी चार आणि दोन चाकी गाड्यांचे मोठे कलेक्शन केले आहे. एखाद्या शो रुमपेक्षा जास्त गाड्या याठिकाणी असल्याचे सांगितले जाते. धोनीच्या कार आणि बाईक कलेक्शनचे फोटो आणि व्हिडिओदेखील बाहेर आले आहेत. धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसल्यामुळे त्याला कार आणि बाईक्सविषयी असणारी आवड जोपासण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत धोनी हॉन्डा रॅपसॉल 150 (Honda Rapsol 150) ही बाईक चावताना दिसत आहे. चाहते त्याची वाट पाहण गेटवर आधीपासून उभे होते. मात्र, धोनी चाहत्यांनी आवज देऊनही त्याठिकाणी थांबला नाही. व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायाल मिळत आहेत.
इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगामात एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज विजेता संघ ठरला. सीएसकेसाठी ही पाचवी आयपीएल ट्रॉफी ठरली असून धोनी रोहित शर्मानंतर दुसरा सर्वात यशस्वी आयपीएल कर्णधार ठरला आहे. सध्या रोहित आणि धोनी यांच्या नावावर प्रत्येक 5-5 आयपीएल ट्रॉफी आहेत. आयपीएल हंगाम संपल्यानंतर मुंबईत धोनीच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया देखील झाली होती. संपूर्ण हंगामात त्याने गुडघ्याच्या वेदनांसह सीएसकेचे नेतृत्व केले होते.
https://www.instagram.com/reel/Cv46cSrsACs/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
कपिल देव यांच्यानंतर धोनी भारताचा सर्वात यशस्वी आणि संघाला विश्वचषक जिंकवून देणारा दुसरा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने 2007 साली टी-20 विश्वचषक जिंकली. ही टी-20 फॉरमॅटमधील पहिला विश्वचषक असून धोनीच्या नेतृत्वातील युवा भारतीय संघाने विजितेपद पटकावल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर त्याने 2011 वनडे विश्वचकात आपल्या नेतृत्वात बारताला दुसरा विश्वचषक जिंकवून दिला. 2013 साली जिंकलेली चॅम्पियन्स ट्रॉफी देखील भारताने धोनीच्या नेतृत्वात जिंकली होती. 2013 नंतर मात्र भारतीय संघ एकही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकला नाहीये. यावर्षी विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी भारताकडे आहे. कारण यावर्षीचा विश्वचषक भारतात होणार असून मायदेशातील परिस्थितीचा आपल्या संघाला फायदा मिळू शकतो. (MS dhoni spotted riding Honda Repsol 150 in ranchi watch viral video )
महत्वाच्या बातम्या –
बुमराहच्या कमबॅकची प्रतीक्षा संपली! आयर्लंड दौऱ्यासाठी कर्णधार आणि भारतीय संघ रवाना
मोठी बातमी! वानिंदू हसरंगाची कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती, 3 वर्षात मिळाल्या फक्त 4 विकेट्स