शुक्रवारी आयपीएल 2020 च्या हंगामातील 7 वा सामना दुबई येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात चेन्नई संघाने नाणेफक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईचा हा स्पर्धेतील तिसरा सामना तर दिल्लीचा दुसरा सामना होता.
प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने निर्धारित 20 षटकात 3 विकेट्स गमावत 175 धावा केल्या होत्या. यादरम्यान चेन्नईचा वेगवान गोलंदाज सॅम करन टाकत असलेल्या 19 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धोनीने दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरचा अचंबित करणारा झेल घेतला. त्याने घेतलेल्या झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
https://twitter.com/naalaYUCK/status/1309515919903744000
https://twitter.com/_itzzWasiiiii/status/1309518162157867009
https://twitter.com/Titan53063455/status/1307353073535168514
https://twitter.com/Kvr_Chowdhary/status/1309517683382087680
सॅम करनने आऊटसाईड ऑफला शॉर्ट चेंडू टाकला होता. यावर अय्यरने फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन मागे गेला. यावेळी धोनीने त्याच्या उजवीकडे झेप घेत शानदार झेल घेतला. त्यामुळे अय्यर २६ धावा करुन बाद झाला. दिल्लीकडून अय्यर व्यतिरिक्त पृथ्वी शॉने अर्धशतक करताना ४३ चेंडूत ६४ धावा केल्या. तर शिखर धवनने ३५ आणि रिषभ पंतने ३७ धावा केल्या. चेन्नईकडून पियुष चावलाने २ आणि सॅम करनने १ विकेट घेतली.