---Advertisement---

सुशांत सिंग राजपूत होता धोनीचा कट्टर फॅन, ‘या’ वर्षी पहिल्यांदा काढला होता धोनीबरोबर फोटो

On: मंगळवार, जून 14, 2022 9:30 AM
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा प्रत्येकजण चाहता आहे. धोनीसारखा हुबेहूब हेलिकॉप्टर शॉट मारुन बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने धोनीला चकित केले होते. 2016 साली सुशांतने ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या धोनीवर आधारित चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका केला होती. 2020 साली 14 जूनला सुशांतचे निधन झाले होते. त्या घटनेला आज दोन वर्ष पूर्ण होत असल्याने त्याच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. 

हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी धोनीने सुशांतचा हेलिकॉप्टर शॉट पाहून खूपच कौतुक केले होते. धोनी म्हणाला, “सुशांतचा हा हेलिकॉप्टर शॉट अगदी माझ्यासारखाच आहे. शूटिंगच्या वेळी अभ्यास करताना कित्येकदा हा शॉट माझ्यापेक्षाही चांगला खेळायचा.”

सुशांत त्यावेळी म्हणाला होता की, ‘धोनी भारतीय संघात आला होता तेव्हापासूनच तो धोनीचा चाहता बनला. मी क्रिकेट खेळत होतो तेव्हा मला कधी वाटले नाही की, बिहार आणि झारखंड कुणी खेळाडू भारतीय संघाकडून खेळताना दिसेल. धोनीला मी पहिल्यांदा 2004 साली पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळताना पाहिले. मोठे-मोठे केस ठेवणाऱ्या धोनीकडे प्रचंड आत्मविश्वास होता. त्या सामन्यात 148 धावांची मोठी खेळी साकारली होती. तेव्हापासून मी धोनीचा फॅन झालो.’

तो म्हणाला होता, ‘ 2006-07 साली पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या वेळी मी धोनीसोबत एक फोटो काढला होता. सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग हे दोन खेळाडू देखील मला खूप आवडतात. पण मी धोनीचा फॅन आहे. त्याने एका छोट्या शहरात येऊन भारतीय संघात आपले स्थान पक्के केले. यासोबत भारतीय संघाचे नेतृत्व देखील सांभाळले. ती गोष्ट इतर खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे.’

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

तिसऱ्या कसोटी सामन्यांत भारतीय संघात होणार ‘हे’ मोठे बदल, जाणून घ्या कशी असेल संघाची ‘प्लेइंग ११’

एकदाचं ठरलं! यापुढे आयपीएल या ठिकाणी पाहता येणार, आयपीएलच्या पुढील ५ वर्षांचे मीडिया राईट्स तब्बल ‘इतक्या’ कोटींत विकले गेलेत

‘सचिन नंतर फक्त ‘या’ खेळाडूचा खेळ बघण्यास उत्सुक आहे’, सुनिल गावस्करांनी जाहिर केली इच्छा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---