आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील सहाव्या सामन्यात एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने (सीएसके) विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) विरुद्ध सहज विजय मिळवला. सीएसकेने आरसीबीचे १५७ धावांचे लक्ष्य १८.१ षटकांत ६ गडी राखून सहज पार केले आणि एक महत्त्वपूर्ण विजय नोंदवला. हा सामना जिंकण्यासाठी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मोठी रणनीती तयार केली होती.
सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने म्हटले आहे की, आरसीबी विरुद्धच्या विजयानंतर मैदानावर पडणाऱ्या ‘दव’शी जुळवून घेणे आणि गोलंदाजीची रणनीती असणे महत्त्वाचे होते.
धोनी म्हणाला, ‘आम्हाला मैदानावर पडणाऱ्या दवांची चिंता होती. म्हणून जेव्हा जेव्हा दव पडण्याची शक्यता असते, तेव्हा आम्ही दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याची रणनिती बनवतो. आरसीबीने चांगली सुरुवात केली पण नवव्या षटकानंतर खेळपट्टी मंदावली. आम्हाला अजून चांगली गोलंदाजी करायची होती. देवदत्त पडिकल जो एका टोकापासून चांगली फलंदाजी करत होता त्याच्यासाठी रवींद्र जडेजाचा स्पेल निर्णायक ठरला. यानंतर ड्वेन ब्राव्हो, जोश हेजलवूड, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर हेही सामन्यात प्रभावी ठरले. तुमच्या डोक्यात नेहमी हा विचार आला पाहिजे की, कोणता गोलंदाज येथे प्रभावी ठरू शकतो.’
तो म्हणाला, ‘मी ड्रिंक ब्रेकपूर्वी मोईन अलीला सांगितले होते की, तो लवकरच गोलंदाजी करेल. पण नंतर मी ठरवले की ब्राव्होने गोलंदाजी करायला पाहिजे. आमच्या खेळाडूंनी कठोर परिश्रम केले आणि त्यांना त्यांची भूमिका आणि जबाबदारी चांगली समजली होती. दुबई आणि अबू धाबीच्या तुलनेत शारजाह मैदानाची खेळपट्टी संथ होती आणि ती दव-अनुकूल होती.’
सीएसके संघाचा प्ले ऑफसाठीचा प्रवेश निश्चित झाला आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांपैकी ७ सामने जिंकले आहेत. यासह ते पुन्हा गुणतालिकेत अव्वलस्थानी आले आहेत. तर आरसीबीला प्ले-ऑफसाठी अजून २ सामन्यात विजय आवश्यक असेल. त्यांनी आतापर्यंत ९ सामन्यांपैकी फक्त ५ सामन्यात विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सीएसकेपुढे आरसीबी नतमस्तक, नाराज कर्णधाराने ड्रेसिंग रूममध्ये घेतला संघाचा समाचार; व्हिडिओची चर्चा
टी२०त १८७ विकेट्स घेणाऱ्या राजस्थानच्या ‘या’ डावखुऱ्या गोलंदाजाचे ५ वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन