भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा जगभरातील लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्यातच आता वेबसिरीज या प्रकाराला युवकांकडून चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. त्यामुळे आता धोनीचा आत्तापर्यंतचा प्रवासही त्याच्या चाहत्यांना वेबसिरिजच्या माध्यमातून पाहता येणार आहे.
त्याचा हा प्रवास हॉटस्टारवर ‘रोअर ऑफ द लायन’ या नावाने डॉक्यूमेंटरी सिरिजमधून पाहता येणार आहे. या सिरीजमध्ये धोनी त्याचे अनभिज्ञ पैलू उलगडणार आहे.
या सिरीजचा टिझर प्रदर्शित झाला आहे. या टिझरमध्ये ‘ एक कहानी हैं, जो आपने अब तक नही सुनि (एक कहाणी आहे, जी तूम्ही अजून ऐकली नाही)’, असे धोनी म्हणताना दिसतो. तसेच तो म्हणतो, ‘ये कहानी है ज़िद्द की(ही गोष्ट आहे जिद्दीची).’
तसेच या शोच्या अधिकृत सारांशमध्ये म्हटले आहे की ‘ एमएसडी, कॅप्टन कूल, थाला आणि अजून बरेच काही म्हणत लाखो चाहते मैदानात आणि मैदानाबाहेर त्याला प्रोत्साहन देत असतात. धोनीची गोष्ट सर्वांना माहित आहे किंवा तूम्ही असा विचार करता. पण त्याच्याकडे सांगण्यासाठी दुसरी गोष्ट आहे, जी त्याच्या जवळच्या मित्रांनाही माहित नाही. ती नक्की काय आहे? खेळाडू, क्रिकेटपटू, कर्णधार, पती, वडील किंवा बरेच काही म्हणून त्यांचा सर्वात कठीण क्षण?’
Oru kadhai solta sir? An all-new Hotstar Special ft. #Thala @msdhoni #RoarOfTheLion #HotstarSpecials 🦁💛 pic.twitter.com/FNryOvCMii
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 5, 2019
धोनी हा सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत व्यस्त आहे. या मालिकेतील तिसरा वनडे सामना 8 मार्चला रांची येथे धोनीच्या घरच्या मैदानावर होणार आहे. या मालिकेत भारतीय संघ 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–त्या निर्णयामुळे सामन्याला मिळाली कलाटणी, कर्णधार कोहलीने केला खूलासा
–‘रनमशिन’ विराट कोहलीला या दिग्गजाने दिले नवीन टोपणनाव
–धोनीचा हा अफलातून झेल टीम इंडियाच्या आला कामी…