भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याला केवळ भारतातूनच नाही, तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांकडून प्रेम मिळाले आहे. त्याच्याप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी चाहते विविध गोष्टी करत असतात. आता त्याच्या चाहत्यांना त्याच्या वाढदिवसाचे वेध लागले आहेत.
धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ साली रांची येथे झाला होता. यावर्षी तो त्याचा ४० वा वाढदिवस साजरा करणार आहे. यानिमित्ताने त्याच्या वाढदिवसाच्या एक आठवड्यापूर्वीच चाहत्यांनी तयारीला सुरुवात केली असून अनेक पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत. धोनीच्या वाढदिवसाचा महिना असलेल्या जुलैच्या १ तारखेपासूनच चाहत्यांनी धोनीचे विक्रम, तसेच फोटो, व्हिडिओ, पोस्टर शेअर करण्यास सुरुवात केली आहे. #DhoniBdayFestBegins असा हॅशटॅगही अनेक चाहत्यांकडून आणि धोनीच्या फॅन पेजेसकडून वापरण्यात आला आहे.
https://twitter.com/KicchaSudeep/status/1410596682379657219
https://twitter.com/DHONIism/status/1410612240508588050
https://twitter.com/NithinWatto_185/status/1410614352558706693
https://twitter.com/Mr_Abhishek0213/status/1410687785258741760
https://twitter.com/BangMahiHaters/status/1278257746660352000
https://twitter.com/im_Narasimhaa/status/1410701377144188928
https://twitter.com/Ashwin_tweetz/status/1410587467367866368
https://twitter.com/7jaiswalshivam/status/1410488406719623176
https://twitter.com/imprabhash28/status/1410604915571843075
https://twitter.com/Shalvi_Rajput07/status/1410617581921210376
https://twitter.com/Dhoni_Tweetz/status/1410614557496668160
https://twitter.com/MSDianAnubhav/status/1410587372337594374
धोनीचा नवा लूक
धोनीसध्या त्याच्या कुटुंबासह रांचीमध्ये आहे. पण काहीदिवसांपूर्वी तो कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह शिमल्याला फिरायला गेला होता. धोनीचे शिमल्यामधील जे फोटो व्हायरल झाले, त्यात धोनी वेगळ्याच लूकमध्ये चाहत्यांना पाहायला मिळाला. धोनी अनेकदा त्याच्या लूकमुळे यापूर्वीही चर्चेत आला आहे. यावेळी पुन्हा एकदा तो त्याच्या लूकमुळे चर्चेत आला होता. धोनीने मिशा वाढवल्या असून त्याचा हा मिशांमधील लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता.
आयपीएल २०२१ च्या उर्वरित हंगामामध्ये दिसणार खेळताना
आयपीएल २०२१ चा हंगाम सुरू झाल्यानंतर धोनी पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल २०२१चा हंगाम २९ सामन्यांनंतर स्थगित करण्यात आला होता. या हंगामातील उर्वरित ३१ सामने युएईत खेळण्यात येणार आहेत. हा हंगाम स्थगित करण्यात आला, तेव्हा धोनीच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्ज संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी होता.
धोनीने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये २११ सामने खेळले असून ४०.२५ च्या सरासरीने ४६६९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २३ अर्धशतके केली आहेत. तसेच आयपीएलमध्ये यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणारा तो यष्टीरक्षक आहे. त्याने आयपीएलमध्ये २०४ डावात यष्टीरक्षण केले असून यष्टीमागे १५३ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याच्या ११४ झेलांचा आणि ३९ यष्टीचीतचा समावेश आहे.
धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्द
धोनीने मागीलवर्षी १५ ऑगस्टरोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. धोनीने त्याच्या कारकिर्दीत ९० कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने ३८.०९ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ६ शतकांचा आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कसोटीत धोनीच्या एका द्विशतकाचाही समावेश आहे. त्याने २०१३ सालामध्ये चेन्नईत झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध २२४ धावांची खेळी केली होती.
तसेच धोनी सर्वाधिक वनडे सामने खेळणारा भारताचा सचिन तेंडूलकर नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा क्रिकेटपटू आहे. धोनीने त्याच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत ३५० वनडे सामने खेळले असून यात त्याने १० शतके आणि ७३ अर्धशतकांसह ५०.५७ च्या सरासरीने १०७७३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर भारताकडून धोनीने ९८ टी२० सामन्यात २ अर्धशतकांसह १६१७ धावा केल्या आहेत.
धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत यष्टीमागे ८२९ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
उर्वरित आयपीएल २०२१ चालू होण्यापूर्वी आरसीबीचा मोठा निर्णय; संघात झाली नव्या व्यक्तीची एन्ट्री