भारतीय संघाचा यावर्षीचा आंतराष्ट्रीय क्रिकेटचा मोसम संपल्याने सर्वांना आता आयपीएलच्या ११ व्या मोसमाचे वेध लागले आहेत. तसेच यावर्षी दोन वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघाच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष राहणार आहे.
विशेष म्हणजे आयपीएल 2018 मध्ये दोन वर्षांच्या कालावधीनंतर कॅप्टनकूल एमएस धोनी पुन्हा एकदा कर्णधाराच्या भूमिकेत सर्वांना दिसणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने 2010 व 2011 असे दोन वर्ष सलग आयपीएलचे विजेतेपदे मिळवली आहेत.
अलीकडेच धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या मुख्यालयात दिसला होता. तसेच नुकतेच चेन्नई सुपर किंग्सने धोनीचे पूल हा खेळ खेळतानाचे फोटो ट्विटरवरून शेअर केले आहेत.
Off the mark! So what if it's a different ball game altogether? #Thala #HomeSweetDen #WhistlePodu 💛 pic.twitter.com/PyzjTNQIDJ
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 22, 2018
त्यातील एक ट्विट असे होते की, ‘ जरी या खेळाचा चेंडू वेगळा असला तरी धोनीनेे तो सहजतेने आणि उत्कृष्टरित्या खेळला.” तसेच चेन्नई सुपर किंग्सने आणखी एक ट्विट शेअर केले. ज्यात धोनीचा पूल खेळतानाचा व्हीडीओ आहे. त्याला ‘ धोनीने आपल्या शैलीने खेळ संपवला!’, अशी कॅप्शन दिली होती.
And Dhoni finishes off in style! @msdhoni #Thala #HomeSweetDen #WhistlePodu pic.twitter.com/gaxGgRsOwG
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 22, 2018
धोनीला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर विश्रांती दिली होती. त्यामुळे आता तो थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. आयपीएलचा सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघात होणार आहे.