भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी मागील अनेक महिने क्रिकेटपासून दूर आहे. पण असे असले तरी मैदानाबाहेरील अनेक गोष्टींमध्ये जसे विविध कार्यक्रमांना उपस्थित रहाणे, कुटुंबासमवेत वेळ घाववणे अशा काही गोष्टींध्ये तो सध्या व्यस्त असल्याचे दिसून आले आहे.
नुकताच तो झारंखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह रांचीमधील जेएससीए क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित एका कार्यक्रमात उपस्थित होता. धोनीने या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांसमवेत जेएससीए क्रिकेट स्टेडियममध्ये सौर यंत्रणेचे, अत्याधुनिक व्यायामशाळेचे, सी 3 फिटनेस क्लब आणि कॅफेचे उद्घाटन केले. तसेच यावेळी त्याने कांद्याच्या पातीने शिट्टी वाजवण्याचाही प्रयत्न केला.
या कार्यक्रमादरम्यान धोनी मस्तीच्या मुडमध्ये असल्याचे दिसून येत होता. त्याने मुख्यमंत्र्यासमवेत कॉफी घेतल्यानंतर कांद्याच्या पातीने शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या प्रयत्नामुळे तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनाही हसू आवरता आले नाही. यावेळी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी देखील शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न केला.
खूप वेळ शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न करत असताना धोनीने तिथे उपस्थित असणाऱ्या एका लहान मुलालाही एक प्रयत्न करुन बघ असे सांगितले. तसेच नंतर तो कोणाला तरी म्हणाला, ‘तो(लहान मुलगा) पण विचार करेल भैय्या, लोक कसे कसे गेम्स खेळतात.’
https://www.facebook.com/krishna.roy.9655/videos/2572751549489349/
धोनी बऱ्याच काळापासून भारतीय क्रिकेट संघापासून दूर आहे. तो शेवटचा सामना 2019 विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्ध उपांत्य फेरीत खेळला आहे. तसेच नुकतेच काही दिवसांपूर्वी धोनीला बीसीसीआयने वार्षिक मानधन करारातूनही वगळले आहे. त्यामुळे सध्या त्याच्या भविष्याबाबत चर्चा होत आहेत.
पहिल्या टी२० सामन्यात दिसू शकतात रोहितसह ४ मुंबईकर
वाचा👉https://t.co/swieao8QOi👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @MumbaiCricAssoc— Maha Sports (@Maha_Sports) January 23, 2020
बीसीसीआयने करारही केला नाही, आता विराट धोनीचं यात विक्रमातून नाव हटवणार
वाचा👉https://t.co/CVYWczpYoj👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 23, 2020