मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाची सुरुवात शानदार राहिली. पहिल्या १२ सामन्यांतच अनेक रोमांचक लढती पाहायला मिळाल्या. पण असे असले तरी गतविजेच्या चेन्नई सुपर किंग्स संघासाठी हा हंगामात फारसा चांगला ठरला नाही. त्यांना पहिल्या तीन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. रविवारी पंजाब किंग्सविरुद्ध चेन्नईने तिसरा पराभव स्विकारला. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असे झाले की, चेन्नईला हंगामातील त्यांच्या पहिल्या तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यातच आता संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी टिकाकारांच्या निशाण्यावर आहे.
धोनीवर होतेय टीका
खरंतर एमएस धोनीचे विविध कारणांनी बऱ्याचदा कौतुक होत असते. पण गेल्या काही वर्षांपासून तो जेव्हाही मैदानावर फलंदाजीसाठी मैदानात उतरतोय, तेव्हा टीकाकारांचे लक्ष्य बनत आहे. याला कारणीभूत ठरतेय ती त्याची धीम्यागतीची फलंदाजी. आयपीएल २०२१ मध्येही चेन्नईने विजेतेपद जिंकले असले, तरी धोनीवर याच कारणामुळे टीका झाली होती. आता रविवारी पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यानंतरही धोनी पुन्हा एकदा ट्रोल होत आहे.
रविवारी धोनी पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर सोशल मीडियावर ट्रेंडही करत होता. धोनीला क्रिकेटविश्वातील एक उत्तम फिनिशर म्हणून ओळखले जाते. मात्र, त्याला पंजाबविरुद्ध ही भूमिका निभावण्याची संधी होती. कारण, चेन्नईला या सामन्यात विजयासाठी १८१ धावांचे आव्हान होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने सुरुवातीच्या विकेट्स झटपट गमावल्या. त्यामुळे धोनी सातव्या क्रमांकावर ८ व्या षटकातच फलंदाजीसाठी आला. त्यावेळी चेन्नईच्या केवळ ३६ धावा झाल्या होत्या.
अशा परिस्थितही धोनीने अत्यंत धिम्यागतीने फलंदाजी केली आणि अखेर तो २८ चेंडू २३ धावा करून बाद झाला. विशेष म्हणजे त्याच्याबरोबर ६ व्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करणाऱ्या शिवम दुबेने आक्रमक खेळ करताना ३० चेंडूत ५७ धावा केल्या. त्याचमुळे धोनीवर सध्या टीका होत आहे. तसेच त्याच्या खेळीवर अनेक मीम्सही व्हायरल झाल्या. अनेकांचे म्हणणे आहे की, आता धोनीमध्ये सामना संपवण्याची पूर्वीसारखी क्षमता राहिलेली नाही. (MS Dhoni Trolled Over Slow Batting Against Punjab Kings in IPL 2022)
https://twitter.com/Ciegocricket/status/1510668048268607491
Credit to Mayank Agarwal, the captain 👏👏 MS Dhoni's slow innings took it beyond CSK's reach. #PBKSvCSK #IPL2022 #CricketTwitter
— Manoj Dimri (@manoj_dimri) April 3, 2022
Dhoni sabotaging Dube by playing test cricket pic.twitter.com/Iesd6lGkNx
— zak (@DEVlLLIERS) April 3, 2022
Dhoni when a crucial run chase is in play. pic.twitter.com/PgKrbGMZKV
— Red and white in my blood (@sabrish29) April 3, 2022
*Dhoni takes a single when Required RR is 15*
Commentators – pic.twitter.com/SZckooo2Xm
— Mayur (@thehumourholic) April 3, 2022
Dhoni at 5 down coming to bat in 8th over pic.twitter.com/nA0sYg5uEx
— oliver (@jaynildave) April 3, 2022
Dube and dhoni partnership pic.twitter.com/WcxboHHzdW
— NAVNEETH (@NavneethKarun) April 3, 2022
Thala dhoni made him re-create this legendary meme 😭😭😭 pic.twitter.com/jKGMOoqD1D
— Ayush (@KohliAdorer) April 3, 2022
110 Required of 48 balls.
Meanwhile, Thala Dhoni – pic.twitter.com/UOIL8wQQEE
— S (@reversepaddle) April 3, 2022
असे असले तरी धोनीने आयपीएल २०२२च्या पहिल्या दोन सामन्यात चेन्नईकडून चांगली फलंदाजी केली होती. त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध अर्धशतक केले होते, तर लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध त्याने ६ चेंडूत १६ धावा ठोकल्या होत्या. पण या दोन्ही सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी केली होती. मात्र, पंजाबविरुद्ध धावांचा पाठलाग करताना धोनीला आक्रमक खेळी करता आली नाही.
दरम्यान, धोनीने आता १२ वर्षे चेन्नई सुपर किंग्सने नेतृत्व सांभाळल्यानंतर कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे आयपीएल २०२२ मध्ये चेन्नईच्या नेतृत्वाची धूरा रविंद्र जडेजा सांभाळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पंत जिथे, इंटरटेनमेंट तिथे! टॉसवेळी दिल्लीच्या कर्णधाराकडून झाली अशी काही चूक की सर्वत्र पिकला हशा
“एकेकाळी मी २०१५ विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होतो, पण नंतर सर्व बदललं”
‘भाई ३डी चष्मा घातलेला का?’, लिविंगस्टोनचा सोपा झेल सोडलेला अंबाती रायुडू ट्रोलर्सच्या निशाण्यावर