संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ साठी भारतीय संघ विजयाच्या दावेदारीसह मैदानात उतरला होता. टी२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची निवड झाल्यापासून भारताला विजेतेपदाच्या मोठ्या आशा होत्या, कारण भारतीय संघात कर्णधार विराट कोहलीसह माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा देखील मार्गदर्शक म्हणून समावेश करण्यात आला होता. पण आत्तापर्यंत अफगाणिस्तानविरुद्धचा विजय वगळता भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत विशेष कामगिरी करू शकलेला नाही. यातच मार्गदर्शक धोनी अजून एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. धोनी चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा होत आहे.
रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी या चित्रपटात अक्षय कुमार एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्यामध्ये कॅटरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत आहे. बऱ्याच काळानंतर दोघे पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहेत. पण, अलीकडेच ‘बॅड मॅन’ गुलशन ग्रोव्हरने सोशल मीडियावर सूर्यवंशीमध्ये धोनीच्या उपस्थितीकडे निर्देश करणारा एक फोटो शेअर केला आहे.
या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये, गुलशन ग्रोव्हरने चाहत्यांना अंदाज लावायला सांगितले आहे, त्याने म्हटले आहे की, ‘सूर्यवंशीच्या सेटवर एमएस धोनीसोबत. काय? एमएस धोनी अक्षय कुमारच्या सूर्यवंशी चित्रपटात काम करत आहे किंवा त्याच स्टुडिओमध्ये काहीतरी वेगळे शूटिंग करत आहे.’
या फोटोत असे दिसते की, धोनी त्याच स्टुडिओमध्ये शूटिंग करत होता, जिथे अक्षयचा सूर्यवंशी शूट केला जात होता आणि धोनीने बॉलीवूडच्या बॅड मॅनसोबत फोटो घेण्यासाठी पोज दिली असावी.
On the sets of #Sooryavanshi with brother @msdhoni . What? Is MS Dhoni acting in the film or happened to filming in the same studio? @akshaykumar pic.twitter.com/BjMkadiZFF
— Gulshan Grover (@GulshanGroverGG) November 2, 2021
‘बॅडमॅन’ उर्फ गुलशन ग्रोव्हर काही दिवसांपूर्वी कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या एमएस धोनीमुळे तणावाखाली आला होता. कारण होते की, धोनीची फॉक्स हॉक हेअरस्टाईल. प्रत्येकजण धोनीच्या नवीन लुकचा आनंद घेत असताना स्तुती करत असताना गुलशन ग्रोव्हर मात्र, थोडा घाबरला होता. धोनीला टॅग करत गुलशनने लिहिले होते, ‘माही भाई खूप छान दिसत आहे! कृपया कोणत्याही डॉनची भूमिका स्वीकारू नको, नाहीतर माझ्या धंद्यावर गदा येईल. आधीच माझे तीन सर्वात प्रिय मित्र संजय दत्त, सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफ मला बाहेर काढण्यासाठी हा प्रयत्न करत आहेत. या व्यवसायाचा अलीम बॅड मॅन येत आहे.’
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटमध्ये ‘असा’ पराक्रम करणारा राहुल द्रविड एकमेव क्रिकेटपटू
पुढील कर्णधार म्हणून द्रविडची ‘या’ दोन नावांना पसंती; म्हणाला…






