चेन्नई सुपर किंग्स संघाचा क्रिकेटपटू एमएस धोनी कर्णधाराच्या रुपात आयपीएल २०२० मध्ये अपयशी ठरला होता. त्याच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघावर सर्वात आधी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली होती. परंतु, याचा धोनीच्या कमाईवर तिळभरही परिणाम झालेला नाही. याउलट धोनी येत्या हंगामात आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक १५० कोटी कमावणारा पहिला खेळाडू ठरणार आहे.
कॅप्टनकूल धोनी आयपीएल २०२१ मध्येही चेन्नई संघाचेच नेतृत्त्व करणार आहे. याच कारणामुळे त्याला १५० कोटी रुपये मिळणार आहे. आतापर्यंत आयपीएलच्या सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा यालाही इतके मिळाले नाहीत. तर सर्वाधिक पैसे कमावणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा विराट कोहलीला देखील इतकी मोठी रक्कम मिळालेली नाही.
जेव्हा चेन्नई संघाने २००८ साली पहिल्यांदा धोनीला संधी दिली होती, तेव्हा संघाने तीन वर्षांसाठी धोनीसोबत ६ कोटी रुपयांचा करार केला होता. त्यामुळे धोनीने ३ वर्षात १८ कोटी रुपये कमावले होते. त्यानंतर पुढील ३ वर्षांसाठी त्याचा ६ कोटींचा करार वाढवून ८.२८ कोटी रुपये करण्यात आला. त्यानंतर २०१४ आणि २०१५ मध्ये त्याच्या मानधनात १० कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली. त्यामुळे या २ वर्षात त्याने २० कोटी कमावले. पुढे जेव्हा धोनी पुणे सुपरजायंट्स संघात सहभागी झाला, तेव्हा पुणे संघाने त्याच्याशी १२.५० कोटींचा करार केला होता. त्यामुळे या २ वर्षात त्याने २५ कोटी कमावले.
त्यानंतर २०१८ मध्ये आयपीएलचा मोठा लिलाव झाला, यामुळे धोनीचे वार्षिक मानधन १५ कोटी करण्यात आले. अशाप्रकारे मागील ३ वर्षात धोनीने एकूण ४५ कोटींची कमाई केली. अर्थात आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून ते तेराव्या हंगामापर्यंतची धोनीची एकूण कमाई १३७ कोटी रुपये इतकी झाली आहे. यावर्षीच्या आयपीएल हंगामात त्याला पुन्हा १५ कोटी रुपये मिळतील. त्यामुळे आयपीएल २०२१ मध्ये धोनी १५० कोटी कमावणारा पहिला खेळाडू ठरेल.
महत्त्वाचे म्हणजे, ही केवळ धोनीच्या वार्षिक कराराची रक्कम आहे. याबरोबरच त्याने दरवर्षी आयपीएलमध्ये जिंकलेल्या वेगवेगळ्या पुरस्कारांची रक्कम पाहिली तर तो निश्चितपणे आतापर्यंत आयपीएलद्वारे त्याने २०० कोटीपर्यंत रुपये कमावले आहेत.
धोनीनंतर आयपीएलद्वारे आतापर्यंत सर्वाधिक पैसे कमावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहितचे नाव येते. आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघाच्या या कर्णधाराने आतापर्यंत कराराद्वारे १३१ कोटी रुपये कमावले आहेत. तर बेंगलोर संघाचा कर्णधार विराट १२६ कोटींसह या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND v AUS Live : खेळपट्टीवर स्थिरावलेले पंत-पुजारा बाद; भारताचा अर्धा संघ तंबूत
“सेंचूरी नंतरची परंपरा…”, सिडनी कसोटीतील धडाकेबाज शतकानंतर स्मिथचं पत्नीसोबत हटके सेलिब्रेशन
कमिन्सच्या सुरेख चेंडूवर कर्णधार अजिंक्य रहाणे बोल्ड, पाहा व्हिडिओ