डब्लिन। भारतीय संघ उद्या, 27 जूनला आयर्लंड विरुद्ध पहिला टी20 सामना खेळणार आहे. हा सामना भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीसाठी खास ठरणार आहे.
धोनीचा हा 90 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना आहे. तो क्रिकेटच्या तिन्ही आंतरराष्ट्रीय प्रकारात प्रत्येकी 90 किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळणारा पहिलाच खेळाडू ठरणार आहे.
अनेक खेळाडूंनी क्रिकेटच्या दोन प्रकारात प्रत्येकी 90 किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळले आहेत. पण तिन्ही प्रकारात असा कारनामा कोणालाही करता आलेला नाही.
धोनीने आत्तापर्यंत 89 टी20 सामने, 318 वनडे आणि 90 कसोटी सामने खेळले आहेत. तसेच तो भारताकडून सर्वाधिक टी20 सामने खेळणारा क्रिकेटपटू आहे.
याबरोबरच कॅप्टनकूल धोनीच्या नावावर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात नेतृत्व करण्याचाही विक्रम आहे. त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या 89 टी 20 सामन्यांपैकी 72 सामन्यात भारताचे कर्णधारपद संभाळले आहे.
धोनी भारताने 1 डिसेंबर 2006ला खेळलेल्या पहिल्या टी20 सामन्याचाही भाग होता. विशेष म्हणजे भारतीय संघ उद्या 100 वा टी 20 सामना खेळणार आहे आणि यावेळीही धोनी भारतीय संघाचा भाग आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–बापरे! ५०० वर्ष जून्या शाळेच्या मैदानावर किंग कोहलीने केला सराव