मोहाली । भारताचा माजी कॅप्टीन कूल एमएस धोनी भारतीय संघाचा दुसरा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या विक्रमाची बरोबरी करणार आहे. धोनी जेव्हा मोहाली वनडेत मैदानात पाऊल ठेवेल तेव्हा तो त्याचा ३११वा वनडे सामना असणार आहे.
भारताकडून सार्वधिक वनडे सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धोनी ५वा आहे. त्याने ३१०वनडेत २६७ डावात फलंदाजी करताना ५१.७८च्या सरासरीने ९८९१ धावा केल्या आहेत. त्यात १० शतके आणि ६७ शतकांचा समावेश आहे.
धोनीने ३१० सामन्यांपैकी ३०७ सामने भारताकडून तर ३ सामने आशिया ११ कडून खेळले आहेत.
भारताकडून सौरव गांगुलीने ३११वनडे सामने खेळले असून त्यात ४१.०२च्या सरासरीने ११३६३ धावा केल्या आहेत.
भारतीय खेळाडू ज्यांनी खेळले आहेत सर्वाधिक वनडे सामने
४६३ सचिन तेंडुलकर
३४४ राहुल द्रविड
३३४ मोहम्मद अझरुद्दीन
३११ सौरव गांगुली
३१० एमएस धोनी