भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी २०१९ वनडे विश्वचषकानंतर क्रिकेट सामना खेळलेला नाही. त्यामुळे जवळ जवळ ८ महिने क्रिकेटपासून दूर असणाऱ्या धोनीच्या भविष्यातील कारकिर्दीबद्दल तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकात त्याचा भारतीय संघात समावेश होणार का याबद्दलही सातत्याने क्रिकेट विश्वात चर्चा होत आहे.
त्याबद्दल अनेकांनी विविध मते मांडली आहेत. आता भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्करांनी म्हटले आहे की धोनी शांततेत निवृत्ती घेईल.
गावस्कर दैनिक जागरणशी बोलताना म्हणाले, ‘मला पण धोनी विश्वचषकासाठी भारताच्या संघात असलेला आवडेल. पण असे घडण्याची शक्यता फार कमी आहे. संघ आता पुढे गेला आहे. धोनी हा असा व्यक्ती नाही जो मोठी घोषणा करेल. तो क्रिकेटमधून शांततेत निवृत्ती घेईल.’
धोनी यावर्षीच्या आयपीएलमधून क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. पण सध्या आयपीएलचा १३ मोसम १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. तसेच देशातील कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता आयपीएलच्या १३ व्या मोसमाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह आहे.
ट्रेंडींग घडामोडी –
-तीने माझं फेसबुक अकाऊंट हॅक केलं, तेव्हापासून मी एफबी वापरणं सोडलं
-आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणारे टाॅप ५ खेळाडू
-मुंबई आणि क्रिकेट: मुंबई क्रिकेटचा दैदिप्यमान इतिहास
-टीम इंडियामधून बाहेर झालेला धोनी बीसीसीआयच्या पोस्टरवरुनही गायब, चाहतेही झाले हैराण
-पंतप्रधान मोदींना का आली युवराज-कैफच्या नेटवेस्ट सिरीजमधील खेळीची आठवण