भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा निवृत्तीनंतरही सातत्याने चर्चेत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर धोनी केवळ आयपीएल खेळताना दिसतो. आता धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे तो ज्या कारणासाठी चर्चेत आला आहे ते कारण क्रिकेट नसून टेनिस आहे. धोनीने रांची येथे चक्क एक टेनिस स्पर्धा जिंकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
झारखंड राज्य क्रिकेट संघटनेने (JSCA) नुकतीच आपल्या संघटनेशी संबंधित व्यक्तींसाठी एक टेनिस स्पर्धा आयोजित केलेली. यामध्ये धोनी पुरुष दुहेरी प्रकारात सहभागी झालेला. 14 नोव्हेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात त्याने सुमित बजाज या आपल्या साथीदाराच्या मदतीने दुहेरीचे विजेतेपद पटकावले. त्यांनी रोहित व विनित या जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव केला. हा अंतिम सामना 10 नोव्हेंबर रोजी अंधुक प्रकाशामुळे अर्ध्यात थांबवला गेलेला.
धोनी क्रिकेट व्यतिरिक्त इतरही खेळ मोठ्या आवडीने व कौशल्याने खेळताना दिसतो. लहानपणी त्याने आपली खेळाची सुरुवात फुटबॉलद्वारे केलेली. अजूनही तो मोकळ्या वेळेत बॅडमिंटन व पोहणे याद्वारे स्वतःला तंदुरुस्त ठेवत असतो. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यापासून तो केवळ आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. आयपीएल 2023 मध्ये तो अखेरच्या वेळी मैदानावर खेळताना दिसणार आहे.
एमएस धोनी याला भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार मानले जाते. जवळपास 9 वर्ष त्याने संघाचे नेतृत्व करताना खेळाच्या तीनही प्रकारात संघाला अव्वलस्थानी नेले. यासोबतच भारताने 2007 मध्ये पहिला टी20 विश्वचषक आपल्या नावे केला. त्यानंतर चार वर्षांने 2011 मध्ये तब्बल 28 वर्षांचा दुष्काळ संपवत त्याच्याच नेतृत्वात भारताने वनडे विश्वचषक उंचावला होता. तर 2013 मध्ये इंग्लंडमध्ये झालेली चॅम्पियन ट्रॉफी भारताने जिंकलेली. त्यानंतर भारतीय संघ कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकू शकला नाही.
(Ms Dhoni Won Tennis Tournament In Ranchi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी कर्णधार हार्दिक करतोय एन्जॉय! शर्टलेस फोटो झाले व्हायरल
संघाची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी बीसीसीआयची धडपड, भारताच्या टी20मध्ये धोनीला मिळू शकते मोठी भूमिका