मंगळवारी(25 सप्टेंबर) ला भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एशिया कप स्पर्धेत झालेल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या जागी महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून खेळला.
ह्या सामन्यात धोनी कर्णधार म्हणून 200 वा वन-डे सामना खेळला. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर 696 दिवसांनी पुन्हा भारतीय संघाचे कर्णधार भुषवले.
त्याच वेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने धोनीचे अभिनंदन करणारा विडीओ सोशियल मीडियावर प्रसिद्ध केला. त्यात धोनीविषयी अनेक महत्वाच्या गोष्टींचा उलगडा केला आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील चेन्नईकडून खेळणारा धोनीचा सहकारी जॉर्ज बेलीने सांगितले की तरूण खेळाडूंशी जवळीक निर्माण होण्यासाठी धोनी त्याच्या खोलीत हूक्याची व्यवस्था करायचा.
“धोनीला हूका ओढायला आवडते त्यामुळे त्याच्या खोलीत हूक्याचा सेट अप असायचा. त्याच्या खोलीत कुणालाही मु्क्त प्रवेश असायचा. त्यामुळे तरूण खेळाडू सतत त्याच्या भोवती असायचे. भारतीय किंवा अनेक संघामध्ये एक प्रकारची उतरंड असायची पण धोनी हे सगळे टाळायचा. त्यामुळे रात्री उशीरा पर्यंत क्रिकेट किंवा क्रिकेटच्या विवीध पैलू विषयी चर्चा चालायची”, असेही बेलीने त्या विडीओ सांगितले.
धोनीचा शांत स्वभाव आणि सामन्यातील परिस्थीतीचे धोनीचे आकलन हे अवर्णनीय आहे. दबावाखाली असताना धोनीची शांतता खूप काही शिकवून जाते.
धोनीला विकेटकिपींग करताना किंवा फलंदाजी करताना इतके शांत पाहिल्यावर तो काहीतरी आखाडा मनात आखत असावा असे वाटते, असेही बेलीने या विडियोत म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-टॉप ३: यष्टीरक्षक एमएस धोनीने केले हे खास विश्वविक्रम
–गुजरात फॉर्च्यूनजायन्ट्सला मिळाला युवा कर्णधार
–भारताविरुद्ध पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक करणाऱ्या लिटॉन दासचा मोठा पराक्रम