कार्डिफ। भारताने मंगळवारी 2019 विश्वचषकापूर्वी झालेल्या दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेश विरुद्ध 95 धावांनी विजय मिळवला आहे. सोफिया गार्डन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी आणि केएल राहुल यांनी शतकी खेळी केल्या.
या सामन्यात धोनीने 78 चेंडूत 113 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 8 चौकार आणि 7 षटकार मारले. तर राहुलने 99 चेंडूत 108 धावांची खेळी करताना 12 चौकार आणि 4 षटकार मारले. या दोघांनी 164 धावांची पाचव्या विकेटसाठी भागीदारीही रचली. तसेच या भागीदारीमुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 359 धावांचा टप्पाही गाठता आला आहे.
त्याचबरोबर धोनीच्या या शतकामुळे एक खास योगायोग 2019 च्या विश्वचषकाआधी घडला आहे. झाले असे की भारताने विजेतेपद मिळवलेल्या 2011 च्या विश्वचषकाआधी झालेल्या सराव सामन्यातही धोनीने शतकी खेळी केली होती.
त्याने 16 फेब्रुवारी 2011 ला चेन्नईमध्ये न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सराव सामन्यात 64 चेंडूत नाबाद 108 धावांची खेळी केली होती. विशेष म्हणजे हा सामना देखील भारताचा विश्वचषकाआधीचा दुसरा सराव सामना होता आणि भारताने प्रथम फलंदाजी केली होती.
या सामन्यात भारताने 5 बाद 360 धावा अशी धावसंख्या उभारली होती. तसेच धोनी आणि सुरेश रैनामध्ये पाचव्या विकेटसाठी 124 धावांची शतकी भागीदारी झाली होती. हा सामना भारताने 117 धावांनी जिंकला होता.
त्याचबरोबर नंतर पुढे जाऊन भारताने 2011 च्या या विश्वचषकाचे विजेतेपदही मिळवले होते.
त्यामुळे आता 2019 च्या विश्वचषकाआधी सराव सामन्यात धोनीने केलेले 113 धावांचे शतक भारतासाठी 2011 विश्वचषकाप्रमाणे लकी ठरणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
2011 विश्वचषक – भारताचा दुसरा सराव सामना – धोनीचे शतक (न्यूझीलंड विरुद्ध, 64 चेंडू, 108* धावा)
2019 विश्वचषक – भारताचा दुसरा सराव सामना – धोनीचे शतक (बांगलादेश विरुद्ध, 78 चेंडूत 113, धावा)#म #मराठी #CWC2019 #INDvBAN #dhoniisback #dhoni @Maha_Sports
— Pranali Kodre (@Pranali_k18) May 28, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–बुमराहच्या सुरेख यॉर्करवर बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू झाला क्लीन बोल्ड, पहा व्हिडिओ
–विश्वचषकापूर्वी रिषभ पंतने टीम इंडियाला दिला खास संदेश
–विश्वचषक २०१९: पहिला सामना खेळण्याआधीच दक्षिण आफ्रिकेला बसला मोठा धक्का