fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

धोनीने ज्या बॅटने षटकार मारत विश्वचषक जिंकला तिला मिळाली भलतीच किंमत

९ वर्षांपूर्वी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने षटकार खेचत भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते.  या विजयामुळे भारताने पुन्हा एकदा २८ वर्षानंतर विश्वचषकावर नाव कोरले होते.

या सामन्यात धोनीने वापरलेली ती बॅट क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडी ठरली आहे. त्याची ही बॅट लंडनमधील चॅरिटी डिनरमध्ये लिलावात जुलै २०११ मध्ये मुंबईच्या आरके ग्लोबल या गुंतवणूक कंपनीने ७२ लाखांना विकत घेतली होती.

यातून आलेले पैसे साक्षी फाउंडेशन या धोनीची पत्नीच्या चॅरिटी फाउंडेशनसाठी दिले आहेत. ही चॅरिटी गरजू लहान मुलांसाठी काम करते.

त्याच्या या बॅटची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमधेही नोंद आहे.

विश्वचषक २०११ च्या अंतिम सामन्यात धोनीने ही बॅट वापरली होती. तसेच त्याने या सामन्यात ७९ चेंडूत ९१ धावा करून भारताला श्रीलंकेवर ६ विकेट्सने विजय मिळवून दिला होता.

२०११ विश्वचषक विशेष-

तो षटकार, ते मैदान आणि तो इतिहास….

आठवण – भारताच्या विश्वविजयाची

गंभीर, धोनी ठरले विजयाचे शिल्पकार, २०११ ला भारताने दुसऱ्यांदा जिंकला विश्वचषक

का झाला होता २०११च्या विश्वचषक अंतिम सामन्यात दोन वेळा टाॅस?

You might also like