भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. धोनीने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्याच्या एका चाहत्याने तर हद्दच केली आली आहे. धोनीचा हा चाहता त्याला भेटण्यासाठी हरियाणावरून रांचीला चालत गेला आहे. धोनीच्या या चाहत्याचे नाव अजय गिल आहे.
अजय हरियाणाच्या जलान खेडा या गावचा रहिवासी आहे. धोनीच्या एका भेटीसाठी त्याने हातात तिरंगा आणि खांद्यावर क्रिकेट किट घेऊन त्याने १६ दिवसांत १४३६ किलोमीटर अंतर चालत पार केले आहे. अजयचे म्हणणे आहे की, तो धोनीला भेटूनच येथून माघारी जाईल. जर तो एवढ्या लांब चालत यात्रा करू शकतो, तर धोनी त्याला भेटायला १० मिनीटाचा वेळ काढू शकत नाही का?
अजय धोनीच्या सिमलिया स्थित फार्म हाऊसच्या बाहेर पोहोचला, पण तो त्याला भेटू शकला नाही. धोनी रांचीत नसल्यामुळे अजयला त्यावला भेटता आले नाही. ज्यावेळी अजय धोनीच्या फार्महाऊस जवळ पोहोचला होता, त्यावेळी धोनी चेन्नईमध्ये होता. त्यानंतर चेन्नईहून तो शुक्रवारी (१३ ऑगस्ट) चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघासोबत आयपीएल २०२१साठी युएईला रवाना झाला आहे.
अजय १२ वी पास आहे आणि तो सध्या त्याच्या शहरातच केस कापण्याचे काम करतो. त्याने सांगितले की, त्याला भविष्यात क्रिकेट खेळायचे आहे आणि त्यातच कारकीर्द घडवायची आहे. जेव्हापासून धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे (१५ ऑगस्ट २०२०) तेव्हापासून अजयनेही क्रिकेट खेळणे बंद केले आहे. आता त्याला धोनीचा आशिर्वाद घेऊन पुन्हा क्रिकेट खेळायचे आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात जास्त यशस्वी कर्णधारांपैकी एक अशी धोनीची ओळख आहे. धोनी आयसीसीच्या तीनही ट्राॅफी जिंकणारा एकमात्र कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ मध्ये टी-२० विश्वकप, २०११ मध्ये त्याच्या वनडे विश्वचषक जिंकला आहे. २०१३ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीही जिंकली आहे. धोनीने भरतीय संघासाठी तीन आयसीसी ट्राॅफी जिंकून क्रिकेटमध्ये देशाचा मान वाढवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
परदेशी मैदानांवर यष्टीरक्षक रिषभचाच बोलबाला, ३७ धावांच्या खेळीसह मोडलाय धोनीचा ‘हा’ रेकॉर्ड
बांगलादेश संघाचा फलंदाजी प्रशिक्षक बनण्यासाठी ‘या’ क्रिकेटरने आपल्या देशातील टीमची सोडली साथ
क्रिकेटर ते प्रशिक्षक बनलेल्या शॉनने निवडला सर्वकालिन वनडे संघ, ‘या’ भारतीयांना दिली जागा